पायलटसह ५ भाविकांचा मृत्यू, जोशीमठजवळील घटना
लोकवाहिनी न्यूज
देहरादून : उत्तराखंडच्या बद्रीनाथहून देहरादूनकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात घडला असून यात वैमानिकासह ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी नंदकिशोर जोशी यांनी दिली. उड्डाणानंतर या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. तेव्हापासून शोध मोहिम राबवली जात होती. अखेर अपघाताची भीती खरी ठरून त्यात वैमानिक आणि ५ प्रवासी मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीच्या या हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट आणि पाच प्रवासी असे एकूण ६ जन प्रवास करत होते. सर्व प्रवासी कर्नाटकातील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हेलिकॉप्टरचा वैमानिक कॅप्टन हिमांशू सभरवाल, प्रताप (वय ४१), अरुण साळुंके (वय ४४), व्ही. बी. शंकर गौडा (वय ३९), सुधीर के. (वय ५०) आणि एस. एस. नटराजा यांचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून देहरादूनच्या सहस्त्रधारा हेलिपॅडकडे जात होते. मात्र, जोशीमठ आणि बद्रीनाथदरम्यान पांडुकेश्वर परिसरात ते डोंगरावर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) (पान ६ वर)
दिवसभरात १२ उड्डाणे
दिवसभरात देहरादूनच्या दिशेने सुमारे १२ हेलिकॉप्टर उड्डाणे झाली होती. ही सर्व उड्डाणे चार्टर स्वरूपातील होती. या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, खराब हवामान आणि अपघाताशी संबंधित परिस्थितीची तपासणी होण्याची शक्यता आहे.








