अमेरिका-इराण तणाव पुन्हा भडकला
लोकवाहिनी न्यूज:वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. युद्धविरामासंदर्भात इराणने अमेरिकेच्या नव्या प्रस्तावाला पाकिस्तानमार्फत उत्तर पाठवले आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव तत्काल फेटाळून लावत तो ‘पूर्णपणे अस्वीकार्य’ असल्याचे म्हटले. तथापि, प्रस्तावातील कोणत्या बाबींवर अमेरिकेची आक्षेपार्ह भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.








