माजी आमदार संदीप जोशी यांची पत्रपरिषदेत माहिती
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : मागील दोन दिवसापासून ऑनलाइन पेटिशनद्वारे लोकसहभाग मिळण्यासाठी डी.जे. व लेझर लाइट या दोन्ही बाबींवर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी जनचवळ सुरु झाली. यामध्ये ऑफलाइन पीटीशनल अत्यंत उत्कृष्ठ लोकसहभाग मिळाला. उत्सव कोणताही असो, आनंद साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र आनंदाच्या नावाखाली होणारा कर्णकर्कश डी.जे., ध्वनिप्रदूषण आणि अतितीव्र लेजर लाइटचा अतिरेक आता थांबला पाहिजे. डीजेच्या वपरावर बंदी आणण्याच्या मागणीसाठी नागपुरात व्यापक जनचवळ उभारण्यात आली असून, चवळळीचा पहिला टप्पा म्हणून ऑनलाइन पेटिशनद्वारे नागरिकांच्या सहभाग नोंदविण्यात येत आहे, अशी माहिती माजी आमदार, माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना संदीप जोशी म्हणाले की, ही चळवळ कोणत्याही धर्माच्या, उत्सवाच्या किंवा समाजाच्या विरोधात नाही. सर्वधर्मीय सण-उत्सव, लग्नसमंरंभ, सामाजिक कार्यक्रम, शहरातील मोठे इव्हेंट तसेच निवडणुकीच्या मिरवणुका यामध्ये आनंद व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र एका व्यक्तीच्या किंवा समूहाच्या आनंदासाठी दुसऱ्या नागरिकाच्या आरोग्याशी आणि शांततेशी तडजोड होऊ नये.
उत्सवाचा आनंद हवा, जल्लोष हवा; पण कर्णकर्कश आवाज नको. डीजेचा अतिरेक हा केवळ काही मिनिटांचा त्रास नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि शांततेशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे आता या विषयाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता व्यापक लोकचवळळीच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची वेळ आली आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यमान ध्वनिप्रदूषण नियमांची कठोर आणि समान पद्धतीने अंमलबजावणी करावी आणि पुढील काळात डीजेच्या वापरावर बंदी आणण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. अतितीव्र लेजर लाईटच्या वापराबाबतही स्पष्ट नियम व नियंत्रण असावे, अशी भूमिका घेण्यात आली.
या चळवळीची सुरुवात केवळ सोशल मीडिया अभियानापुरती मर्यादित न ठेवता टप्प्याटप्प्याने व्यापक लोकसहभाग मिळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची भूमिका आणि लोकसमर्थन जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पेटिशन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी पेटिशनवर स्वाक्षरी करून डीजे बंदीच्या मागणीला आपला पाठिंबा नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या स्वास्थ्या आणि लोकसमर्थनाच्या आधाराने जिल्हाधिकारी, नागपूर; आयुक्त, नागपूर महानगरपालिका; पोलीस आयुक्त, नागपूर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे ४ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात डीजे आणि ध्वनिप्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत सोशल मीडिया, व्हिडिओ, पोस्टर, प्रत्यक्ष संवाद आदी माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यात ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी डॉक्टर, आरोग्यतज्ज्ञ, ध्वनितज्ज्ञ आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना यापूर्वी प्रातिनिधिक स्वरूपात जोडले आहे. पाचव्या टप्प्यात व्यापक प्रमाणात या अभियानाशी जोडण्यात येणार आहे. सहाव्या टप्प्यात ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी तसेच डीजे व लेझर लाईटवर कायमस्वरूपी बंदी होण्यासाठी नागपुरातील सर्व आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आदी सर्वांना पत्र देऊन या चळवळीत पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येईल.
सहाव्या टप्प्यात मंडळेंसह विविध उत्सवांचे आयोजक, सामाजिक संस्था, कार्यक्रम आयोजक आणि नागरिकांशी संवाद साधून ‘उत्सव मोठा करा, आवाज नाही’ हा संदेश पोहोचविण्यात येणार आहे. सातव्या टप्प्यात ऑनलाइन पेटिशनसोबत नागरिकांचे प्रत्यक्ष समर्थन, सूचना आणि अनुभव संकलित करून या विषयाला व्यापक लोकांदोलनाचे स्वरूप देण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. मंजुषा गिरी, इलेक्टेड अध्यक्ष आयएमए महाराष्ट्र, डॉ. सचिन गाठे, अध्यक्ष आयएमए, नागपूर तसेच तेजेंदरसिंह रेणू सचिव विदर्भ टॅक्स पेअर्स असोसिएशन उपस्थित होते.
डी.जे. बंदीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा
आठव्या टप्प्यात नियमांची कठोर अंमलबजावणी आणि त्यानंतर डीजेच्या वापराबर तसेच लेझर लाइटवर कायमस्वरूपी बंदी आणण्याच्या मागणीसाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.









