पोलिसांकडून दोघांना अटक
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील जुहू परिसरातील त्यांच्या ‘जल्सा’ या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने वेळेच कारवाई करत हा कट उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी दिल्ली आणि मुंबईतून दोन संशयित आरोपांना अटक केली असून, या घटनेमुळे चित्रपटसृष्टीसह पोलिस यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला गुप्त सूत्रत्रांडून अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट आखला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास केला. कटामागील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपाсаदरम्यान या कटाशी संबंधित दोन संशयितांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून दोघांनाही ताब्यात घेतले.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक सिंह उर्फ दीप आणि विकास ठाकूर उर्फ विक्की अशी आहेत. दीपक सिंह याला मुंबईतील ठाणे परिसरातून अटक करण्यात आली, तर २५ वर्षीय विकास ठाकूर याला दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आले. विकास ठाकूर हा मूळचा पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तो मुंबईतून दिल्लीला गेल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला अटक केली. विकास ठाकूर याच्या चौकशीदरम्यान पोलिसांना मुंबईत वास्तव्यास असलेल्या दीपक सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन कारवाई केली आणि दीपकला अटक केली. दीपक हा पंजाबमधील तरनतारन जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे.















