कोलकात्यातील सरकारी इमारतीलो भीषण आग
लोकवाहिनी न्यूज
कोलकाता : पश्चिम बंगालमधील एका सरकारी इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत सुमारे ४,००० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) जळून खाक झाली. हे ईव्हीएम मशिन पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वापरली होती, अशी माहिती सुवेंदू सरकारमधील मंत्री कौशिक चौधरी यांनी दिली.
या घटनेप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दक्षिण कोलकात्याच्या अलीपूर भागातील नऊ मजली इमारतीला बुधवारी भीषण आग लागली. या इमारतीत इतर विभागांव्यतिरिक्त दक्षिण २४ परगणा जिल्हा परिषदेचे कार्यालयही होते.
मंत्री चौधरी म्हणाले, आगीत ४,००० ईव्हीएम नष्ट झाल्या आहेत. यावर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीदरम्यान १० मतदारसंघांमध्ये हे ईव्हीएम वापरण्यात आले होते, ही सामान्य आग वाटत नाही. यात काही घातपात झाला होता का, याचा आम्ही तपास करत आहोत.









