दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचे निधन
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : भारतीय निशानेबाजीला मोठा धक्का बसला असून दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचे गुरुवारी रात्री नवी दिल्लीतील साकेत येथील खासगी रुग्णालयात निधन झाले ते ४९ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच जर्मनीतील म्युनिख येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतून भारतीय पथकासोबत परतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर हृदयविकाराशी संबंधित उपचार सुरू होते आणि त्यांना स्टेंटही बसविण्यात आला होता.
जसपाल राणा सध्या भारताच्या पिस्टल निशानेबाजी संघाचे उच्च कार्यप्रदर्शन प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने भारतीय खेळविश्वात, विशेषतः शूटिंग क्षेत्रात शोककळा पसरली आहे. खेळाडू म्हणून तसेच प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशाच्या निशानेबाजीला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली.









