फ्लेक्स-फ्यूल वाहनांचा मार्ग मोकळा
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये एक दुरुस्ती अधिसूचित केली आहे. यामुळे १०० टक्के इथेनॉल, म्हणजेच ई-१०० इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्यूल वाहनांचा मार्ग मोकळा झाला आहे. पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीवर नाही, तर १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या लवकरच देशाच्या रस्त्यांवर धावताना दिखतील, तथापि, याचा वापर केवळ अशा वाहनांमध्येच केला जाईल, जो उत्पादकाने विशेषतः ई-१०० इंधनावर चालण्यासाठी तयार केली आहेत. नवीन अधिसूचनेनुसार, ई-८५ इंधनासोबत आता ई-१०० चा देखील उत्ससर्जन तरतुदींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे फ्लेक्स-फ्यूल वाहनांच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. फ्लेक्स-फ्यूल वाहनांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात एकच इंधन टाकी असते, ज्यामध्ये तुम्ही पेट्रोल आणि इथेनॉल कोणत्याही प्रमाणात मिसळू शकता. सोप्या भाषेत सांगायचे तर, टाकीमध्ये १०० टक्के पेट्रोल, ८५ टक्के इथेनॉल किंवा शुद्ध इथेनॉल असले तरी, इंजिन कोणत्याही अडथळ्याशिवाय इंधनाचे मिश्रण आपोआप समायोजित करते.
भारतीय रस्त्यांवरील सध्याच्या पारंपरिक गाड्या ई-८५ किंवा ई-१०० इंधनावर चालू शकत नाहीत. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मते, सध्या नियमित पेट्रोल किंवा ई-२० साठी (२० टक्के इथेनॉल) डिझाइन केलेल्या गाड्यांना उच्च-स्तरीय इथेनॉल इंधन वापरण्याची परवानगी नाही.
ई-८५ इंधन निवडक सरकारी तेल कंपन्यांच्या आउटलेटवर आधीच उपलब्ध झाले आहे. सरकारचे उद्दिष्ट आहे की डिसेंबर २०२६ पर्यंत ५०० आउटलेट्स आणि डिसेंबर २०२७ पर्यंत ५,००० आउटलेट्सपर्यंत याचा विस्तार करावा. काही ऑटोमोबाईल कंपन्या पुढील काही महिन्यांत त्यांचे १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार आणि बाईक्स बाजारात आणण्यास सुरुवात करू शकतात.
ग्राहकांनी ही बाब ધ્યાनात घ्यावी की, ऑटोमोबाईल कंपन्यांनी खास डिझाइन केलेल्या नवीन फ्लेक्स-फ्यूल कार किंवा बाईक्स खरेदी करणारिंच विशेष फ्लेक्स-फ्यूल वाहनांमधील इंधन वापरू शकतील. ही वाहने ई-८५ किंवा ई-१०० वर चालण्यासाठी ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सकडून प्रमाणित केली जातील.
सध्याची पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल वाहने अजिबात बंद केली जाणार नाहीत, असा खुलासा सरकारतर्फे करण्यात आला आहे. ग्राहकांकडे जुनी किंवा नवीन पेट्रोल-डिझेल कार किंवा बाईक असेल, तर ते आपली वाहने पुढील अनेक वर्षे कोणत्याही भीतीशिवाय चालू शकतात. फ्लेक्स-फ्यूल (ई-८५/ई-१००) धोरणाचा उद्देश जुनी वाहने टप्प्याटप्प्याने बंद करणे तर नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.












