-
विकासाच्या संधीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य – मुख्यमंत्री
-
‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल
-
पायाभूत सुविधांचे भूमिपूजन; भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटप
-
लोकवाहिनी न्यूज
-
नवी मुंबई : नैना ( नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र ) परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विकासाचे भागीदार बनविण्यासह आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. -
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे नैना परिसरातील विकासाकामांचे भूमिपूजन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी विकसित करण्यात आलेल्या एसबीआर-९, बीआर-४, बीआर-५ आणि उरण बायपास पूल या महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
-
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री भरत गोगावले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, अतुल पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकुर, आमदार निरंजन डाखोरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरेश मंगडे आदी उपस्थित होते.
October 26, 2026
0 Comment
0 Views
नैना क्षेत्रात १५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
by Digital Desk
विकासाच्या संधीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य – मुख्यमंत्री ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल पायाभूत सुविधांचे भूमिपूजन; भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटप लोकवाहिनी न्यूज नवी मुंबई : नैना ( नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र ) परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या... Read More














