सुरेशराज राहेरकर यांचे प्रतिपादन
-
लोकवाहिनी न्यूज
-
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भगवान श्री चक्रधर स्वामी अध्ययन व महात्मा गांधी विचारधारा विभागाच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा दिन व कांचन प्रेरणा दिननिमित्त ‘श्रीधरानंद शास्त्री पातुरकर यांचे महानुभाव साहित्य व संशोधनातील योगदान’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा परिसंवाद पार पडला.
-
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी विचारधारा विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद वाटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या वाचन व लेखनविषयक विचारanchi आढावा घेतला. वाचन आणि लेखन ही जीवनभर सुरू राहणारी अखंड प्रक्रिया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
-
या परिसंवादात ब्रह्मविद्या संशोधन व संशोधन संस्था, तरडगाव येथील पु.म. सुरेशराज दादा राहेरकर यांनी श्रीधरानंद शास्त्री यांच्या ‘मी असे लिहीत गेलो’ या ग्रंथाच्या अनुषंगाने त्यांच्या लेखनप्रवासाचा आणि संशोधनकार्याचा आढावा घेतला. या ग्रंथातून लेखन वाचनाची प्रेरणा मिळते. या ग्रंथातील श्रीचक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभूविषयक लेख महत्त्वपूर्ण असून चक्रधरोक्त संस्कृत सूत्रे हा लेख महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले, श्रीधरानंद शास्त्री यांनी संपूर्ण आयूषभर वाचन आणि लेखनाची साधना केली. महानुभाव तत्वज्ञानातील सूक्ष्म बारकावे, कुप्रप्रश्न तसेच ग्रंथामधील विविध घटनांची सत्यता तपासून पाहाण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांच्या संशोधनातून अनेक दुर्लक्षित विषयांवर प्रकाश पडला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जीवनासंबंधी कालनर्णय ठरवण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले, पिल्ले जंजीरचा आधार घेत यादवकालीन घटनांची सुसंगत मांडणी त्यांनी खगोलीय शास्त्रानुसार केली, असे मत व्यक्त केले.
-
गोपाल कपाटे यांनी ‘भलाई को कुछ बातें’ या ग्रंथाच्या अनुषंगाने श्रीधरानंद शास्त्री यांच्या विचारविश्वाचा परिचय करून दिला. या ग्रंथातील मौलिक विचार मानवी जीवनला दिशा देणारे असून, लहोतील हितोपदेशात्मक आश्रय प्रत्येक व्यक्तीला आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करणार आहे, मानवी जीवनातील मूल्ये आणि आचरण याविषयी विचार करण्यास प्रवृत्त करणारे साहित्य या ग्रंथात समाविष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
डॉ. भारतभूषण शास्त्री यांनी ‘महानुभावकीय बृहत् कालनिर्णय’ या ग्रंथाच्या आधाराने श्रीधरानंद शास्त्री यांच्या कालगणनाविषयक संशोधनाचे विवेचन केले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनतील आठ दिवाळीच्या कालनिर्णयासह लीलाचरित्रातील विविध लीलांचा कालक्रम निश्चित करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न अभ्यासच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. महानुभाव साहित्यातील यादवकालीन घटनांचा कालक्रम निश्चित करणे हे ऐतिहासिक संशोधनातील आह्वाननात्मक कार्य असून, शकनिर्धारणाच्या माध्यमातून घटनांचा सुसंगत क्रम लावण्याचा प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे.
-
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता शहाणे यांनी केले, तर विकी डहाट यांनी आभार मानले. या परिसंवादाला महानुभाव साहित्य, संशोधन आणि संपादन क्षेत्रातील अभ्यासकांची उपस्थिती होती.












