नागपूर पदवीधरसाठी बजावला मतदानाचा हक्क
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सर्वात आधी प्रमुख उमेदवारांनी मतदान केले. पदवीधर मतदारसंघांतून अनेkada प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानांतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीमतानाचा हक्क बजावला.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मतदान सुरू झाले आहे. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस व भाजप या दोन पक्षात चुरशीची लढत आहे. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविनगर येथील दादाजी धुनिवले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप उमेदवार सुधाकर कोहले, माजी आमदार प्रा. अनिल सोले उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी मतदारांच्या उत्साहात योग्य पद्धतीने निकाल लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी फडणवीस यांनी स्मायपनेन मतदान केले जाते, याबाबत मला माहीत नाही. सुप्रिया सुळे यांनी मला तो पेन मला पाठवावा, मी समजून घेईल, असे सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट दिली. ते विवेकानंदनगर परिसरातील मतदान केंद्रावर पोहोचले.
नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांत मतदारांना त्यांचा मतदान केंद्राची माहिती देणे, आवश्यक मार्गदर्शन करणे आणि मतदानासाठी प्रोत्साहित करणे, यावर कार्यकर्त्यांचा भर होता.
कोहले व वंजारी यांच्यात प्रमुख लढत
नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीचे सुधाकर कोहले व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र, एकूण ३८ उमेदवार रिंगणात असल्याने कोणाचे पारडे जड आहे? याचा अंदाज अनेक राजकीय पुरंदरांना बांधता आलेला नाही. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांची पावले मतदान केंद्राकडे वळू लागली. मतदान केंद्राच्या परिसरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. मतदारांना मतदान केंद्र शोधण्यापासून ते मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यापर्यंत कार्यकर्ते सक्रिय दिसून आले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असल्याने बूथपातळीवरील यंत्रणा सक्रिय होती.













