लोकवाहिनी न्यूज मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महालक्ष्मीहून मुरबाडकडे निघालेल्या हेलिकॉप्टरला कल्याणजवळ वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्यांचे हेलिकॉप्टर वादळात अडकले होते. तथापि, पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका लग्नासाठी जात असताना ही घटना घडली आहे. खराब हवामानामुळे जुहू नजीक हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
गुरुवारी सायंकाळी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये वादळासह सुसाट्याचा वारा सुटला होता. यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर तब्बल वीस मिनिटे वादळात घिरट्या घालत होते. पायलटने योग्यरित्या हेलिकॉप्टर जुहू येथे उतरवले. मुरबाडला जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले इतर सहकारी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.








