लोकवाहिनी न्यूज
भागलपूर : ‘धरती पकड’ म्हणून ओळख असलेले नागरमल बाजोरिया यांचे गुरुवारी पाटना येथे निधन झाले. त्यांनी २५२ वेळा निवडणूक लढवून अनोखा विक्रम प्रस्थापित केला. पराभव होऊनही त्यांची निवडणूक कारकीर्द कधीही थांबली नाही.
ते केवळ भारतातच नव्हे तर जगात एक अद्वितीय व्यक्ती होते. ते जगातील एकमेव व्यक्ती होते, ज्यांनी २५२ वेळा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि प्रत्येक वेळी त्यांचा पराभव झाला. त्यांना पराभवाची भीती वाटत नव्हती. म्हणूनच राष्ट्रपती निवडणुकीसाठी वारंवार उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ते प्रसिद्ध झाले. अनामत रक्कम जप्त होण्याचा विक्रमही त्यांनी केला. त्यांनी काही आंतरराष्ट्रीय निवडणुकांमध्येही उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
नागरमल बाजोरिया यांनी निवडणुका लढताना आपल्या व्याप्तीचा कधीही विचार केला नाही किंवा अनामत रकमेची चिंता केली नाही. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सोशल मीडियाच्या युगापूर्वी धरतीपकड सर्व माध्यमांमध्ये ओळखले जात होते. प्रत्येक राज्यात त्यांच्या नावाची चर्चा होत असे. धरतीपकड यांनी गुरुवारी पाटना येथे वयाच्या ८०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधानाच्या बातमीने त्यांच्याशी संबंधित असलेल्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. त्यांचे पार्थिव भागलपूर येथे आणण्यात आले आहे.









