नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन भागात वसतिगृह असलेली पाच मजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत किमान चौघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आतापर्यंत अनेकांना मलब्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असताना ढिगाराखाली अनेकजण, प्रामुख्याने विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह विविध पथके घटनास्थलॉी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. दुपारीच्या सुमारास नानकपुरा गुरुद्वारानजीक इमारत कोसळल्याबाबत पीसीआर कॉल आला. एनडीआरएफचे पथकही घटनास्थलॉी पोहोचले व बचाव आणि मदतकार्य सुरू केले, असे दक्षिण-पश्चिम विभागाचे डीसीपी अमित गोयल यांनी सांगितले.
हॉस्टल डेझ नावाचे वसतिगृह असलेल्या या इमारतीचे मालक आज़ाद बंसल होते. नूतनीकरणाचे काम आणि तळघराचे खोदकाम यामुळे इमारतीचा खालचा आधार कमजोर झाला असावा, असा संशय तपासकर्त्यांना आहे.












