भारत-चीन संबंध सुधारण्याचे संकेत
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आपल्या सैनिकांच्या तैनातीीत मोठी घट केली आहे. त्यामुळे भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा आणि सीमावर्ती भागात स्थैर्य निर्माण होण्याचे संकेत मिळत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
२०२५ मध्ये भारताच्या उत्तरेकडील सीमेसमोर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तैनातीीत लक्षणीय घट झाली. एलएसी लगतच्या भागांमध्ये तसेच पारंपरिक प्रशिक्षण क्षेत्रामध्ये कंबाईंड आर्म्स ब्रिगेडच्या आकाराच्या सुमारे १० टुकड्या तैनात राहिल्या. दरम्यान, एलएसीच्या सर्व सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची तैनाती मजबूत आणि योग्य स्थितीत ठेवण्यात आली असून, अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. चिनी सैन्याच्या तैनातीीत झालेली ही घट भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या राजकीय, राजनैतिक आणि लष्करी संपर्कांच्या पृष्ठभूमिओवर झाली आहे. या घडामोडींमुळे उत्तरेकडील सीमांवर अधिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत झाली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले.










