नागपुर ते पंजाब चार राज्यांचा प्रवास
लोकवाहिनी न्यूज
नागपुर : विसरभोळपणा आणि मानसिक स्थितीतील अडचणींमुळे वारंवार भटकणाऱ्या ७७ वर्षीय बाबुराम यांना अखेर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यात यश आले. नागपूर महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत समान विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या भिक्षकरी पुनर्वसन प्रकल्पातील सह्याद्री फाउंडेशन संचालित आस्थ पुनर्वसन निवारा गुहाच्या पुढाकारातून १५ ऑक्टोबरला पंजाब राज्यातील त्यांचा मूळ गावी परिवार मिलन घडवून आणण्यात आले.
बाबुराम हे पाचपावली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून आस्थ पुनर्वसन निवारा गुहात दाखल झाले होते. त्यांची मानसिक स्थिती अस्थिर होती. सुरुवातीच्या काळात ते वारंवार आरडाओरडा करीत असत. विसरभोळपणाामुळे ते निवारा गुहाच्या परिसरात भटकत असत. तसेचं, इतरांशी वाद होण्याचे प्रसंगही घडत होते. त्यामुळे त्यांची योग्य देखभाल, समुपदेशन आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यात आले. यापूर्वीही बाबुराम विसरभोळपणांमुळे राजस्थान आणि पंजाब परिसरात भटकले होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेऊन त्यांना पुन्हा घरी आणले होते. मात्र, त्यानंतरही ते पुन्हा भटकले आणि चार राज्यांचा प्रवास करीत नागपूरपर्यंत पोहोचले. त्यामुळे त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे महत्वाचे होते.
पोलिसांच्या सहकार्याने कुटुंबाचा शोध
आस्था निवारा गुहात दाखल झाल्यानंतर बाबुराम यांच्या आरोग्याची, दैनंदिन गरजांची आणि मानसिक स्थितीची काळजी घेण्यात आली. त्यांचे समुपदेशन करण्यात आले, तसेच कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. आस्था निवारा गुहाचे व्यवस्थापक वैभव बागडे यांनी बाबुराम यांची परिस्थिती लक्षात घेऊन अजनी पोलिस ठाण्याच्या मिसिंग विभागातील रुखसार शेख यांच्याशी संपर्क साधला आणि आवश्यक माहिती दिली.














