टर्मिनलच्या नूतनीकरणासाठी जीएमआर सज्ज
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : जीएमआर एरोच्या नेतृत्वाखालील समूहातील जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (जीएनआयएएल) यांनी गेल्या तीन महिन्यांत नागपूर विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देणाऱ्या विविध उपायांना राबविल्या आहेत. या उपक्रमांमध्ये प्रवासी सुविधा, टर्मिनलचे वातावरण, स्वच्छता, सुरक्षा तपासणी आणि सामान हाताळणी सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. याचसोबत, विमानतळाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने टर्मिनलच्या सर्वसमावेशक नूतनीकरणाची योजना तयार असून, हे काम सुरू करण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळविण्याकरिता संबंधित नियामक प्राधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधला जात आहे.
जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भंडाकर म्हणाले, सेवेचा दर्जा, कार्यक्षम परिचालन, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षित सुधारणा करून नागपूर विमानतळावरील प्रवासी अनुभव सातत्याने अधिक चांगला करण्यावर आमचा भर आहे. गेल्या काही महिन्यांत आम्ही प्रवाशांच्या प्रवासाशी संबंधित महत्त्वाच्या टप्प्यांवर अनेक तातडीच्या सुधारणा लागू केल्या आहेत. त्याचबरोबर, विमानतळाची क्षमता वाढविणे, प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ करणे आणि अधिक आरामदायी व सुरळीत प्रवासाचा अनुभव देण्यासाठी टर्मिनलच्या सर्वसमावेशक नूतनीकरणाची तयारीही सुरू आहे. आर्थिक पूर्तता सुनिश्चित झाली असून, महत्त्वाच्या पूर्वतयारीच्या कामांसह डिझाइन विकसित करण्याची प्रक्रिया पुढे नेली आहे आणि ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. आवश्यक नियामक मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प सुरू करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. हे सर्व उपक्रम मुख्य भारतासाठी नागपूर विमानतळाचा आधुनिक विमान वाहतूक प्रवेशद्वार म्हणून विकास करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
प्रस्तावित नूतनीकरणामध्ये विद्यमान टर्मिनलच्या सुमारे १९,५०० चौरस मीटर क्षेत्राचा, तसेच प्रवाशांच्या वापरातील हवाई बाजू आणि भू-बाजूवरील महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असेल. यात चार स्वचलित सामान जमा करण्याचे काउंटर आणि पाच स्व-चेक-इन किऑस्क बसविणे, चार नवीन एक्स-रे यंत्रांची भर घालणे, यापैकी तीन देशांतर्गत उड्डाणांसाठी आणि एक आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी असेल. याशिवाय, निर्गमनासाठी दोन नवीन प्रवेशद्वारे उभारणे, टर्मिनल्समोरिल वाहन थांबविण्याच्या क्षेत्राचा विस्तार, स्वच्छतगृहांचे अध्यायास्तीकरण, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी स्वतंत्र विश्रामगृहे आणि बसमधून विमानत चढ़ण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारांची संख्या दोनवरून चार करणे.
प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गामध्ये, विमानात चढण्याच्या सुविधांमध्ये, पादचारी मार्गांमध्ये, किरकोळ विक्रीच्या जागांमध्ये तसेच प्रवाशांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी असलेल्या क्षेत्रांमध्ये सुधारणा केली जाईल. नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाल्यापासून १२ ते १८ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहे. हे प्रकल्पाच्या कालावपत्रकावर आणि आवश्यक मंजुरी मिळवण्यावर अवलंबून असेल, तसेच डिज़ी यात्रा ई-गेट्स, चेक-इन हॉल, विमानात चढ़ण्यापूर्वीची सुरक्षा तपासणी केंद्र, बोर्डिंग गेट्स आणि आगमन हॉल येथे प्रवासी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच, इमिग्रेशन आणि इमिग्रेशन काऊंटरसह प्रवाशांच्या हालचालींशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणी रांगेचे व्यवस्थापन करणारे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांची प्रक्रिया अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होण्यासाठी चेहरा ओळखण्यावर आधारित तपासणी प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या आहेत. विमानात चढ़ण्यापूर्वीच्या सुरक्षा तपासणी केंद्रावर मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या नवीन ट्रे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ट्रेच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रवाशांची सोय वाढविण्यासाठी सुरक्षा तपासणी केंद्रावर तसेच सुरक्षा तपासणीनंतरच्या प्रतीक्षा क्षेत्रामध्ये सामान ठेवून तयारी करण्यासाठी टेबल्सही बसविण्यात आले आहेत.
२४ तास वैद्यकीय पथक
आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि प्रवाशांची काळजी अधिक सक्षम करण्यासाठी एम्सबीबीएस डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी आणि तंत्रज्ञ २४ तास, आठवड्याचे साही दिवस उपलब्ध करण्यात आले आहेत.














