नागपूर : श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्य तथा माजी आमदार अशोक मानकर यांच्या धर्मपत्नी प्रगती मानकर यांचे शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक मानकर, मुली अंकिता वैद्य, डॉ. अपेक्षा गोतमारे, अमृता संंगावार यांच्यासह बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार पार पडला.
प्रगती मानकर या श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. अशोक प्रकाशन प्रा. लिमिटेड, स्वयंसिद्धा उद्योग समूह, गायत्री महिला उद्योग, प्रगती एज्युकेशन सोसायटीसह अनेक नामवंत संस्थांच्या संचालिका म्हणूनही त्या कार्यरत होत्या. एवढेच नव्हे तर महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे.
त्यांच्या पार्थिवाचे मेडिकल चौकातील निवासस्थानी अनेक मान्यवरांनी अंतрдशन घेत श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी कांचन गडकरी, बाबा नंदनपवार, आमदार डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार प्रा. अनिल सोले, आमदार प्रवीण दटके, आमदार कृपाल तुमाने, उदयभास्कर नायर, धनंजय बापट, समीर गौतम, मीरा कडबे, आशीष बडगे, अजय बोहारे, अविनाश ठाकरे, अर्चना डेहनकर, नीलिमा बावणे, जयप्रकाश गुप्ता, सुधीर पार्वे, अविनाश खळतकर, संजय निंबाळकर, किशोर कन्हेरे, संजय नाथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.















