निर्धारित वेळेपर्यंत केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांना क्रमांक देऊन मतदानाची संधी
लोकवाहिनी न्यूज
हिंगणा : नागपुर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या मतदानदरम्याने हिंगणा तालुक्यातील पदवीधर तरुण-तरुणींमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. हिंगणा तहसील कार्यालय येथे तालुक्यातील मतदारांसाठी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती.
हिंगणा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर चोख पुलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानसाठी खोली क्रमांक १, २, ३ व ४ मध्ये व्यवस्था करण्यात आली hoti. यापैकी खोली क्रमांक १ मध्ये मतदारांच्या सर्वाधिक रंगा दिसून आल्द, तर इतर मतदान कक्षांमध्ये मतदारांनी मोठ्या संख्यने उपस्थिती लावली.
मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत पदवीधर मतदारांमध्ये मतदान करण्याचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सायंकाळी ४ वाजता मतदान केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. निर्धारित वेळेपर्यंत केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांना क्रमांक देऊन मतदानाची संधी देण्यात आली.
हिंगणा तहसील कार्यालयातील मतदान प्रक्रियेदरम्यान शिस्तबद्ध व्यवस्था व पुलिस बंदोबस्तामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडली. तरुण पदवीधरांचा उत्स्फूर्त सहभाग या मतदानाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
वाडीत शांततेत मतदान
वाडी : नागपुर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वाडी नगर परिषद कार्यालयातील तीन मतदान केंद्रावर शांततेत पार पडली. नगरपरिषद कार्यालयात एकूण तीन बूथवर १६९२ मतदानपैकी १०२२ मतदान झाले असून एकूण मतदानाच्या ६०.३६ टक्के मतदान झाल्याचे कातविप्यात आले.
वाडी नगर परिषद कार्यालयात पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तीन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे स्थानीय मतदारांना वहीतच मतदानाची सुविधा उपलब्ध झाली.
मात्र, वाडी परिसरातील काही मतदारांची नावे बेसा येथील मतदान केंद्राच्या मतदार यादीत असल्याने संबंधित मतदारमध्ये गोंधळ निर्माण झाला. मतदानसाठी केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदार यादीत नाव शोधताना काही मतदान अड़चणीचा सामना करावा लागला. त्यामुळे आपल्या नावाची नोंद नेमक्या कोणत्या मतदान केंद्रावर आहे. याबबत मतदारांत संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, वाडी परिषद कार्यालयतील तीनही मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वाडीत प्रथमच तीन केंद्रांची व्यवस्था झाल्याने या निवडणुकीची स्थानीय पातळीवर विशेष चर्चा होती. मतदानदरम्यान कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.













