१८ नोव्हेंबर रोजी ‘स्थानक महोत्सव’चे आयोजन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेलवे स्टेशनच्या ११४ गौरवशाली वर्षांच्या पूर्ततेनिमित्त १८ नोव्हेंबर रोजी ‘स्थानक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या स्थानकाचे ऐतिहासिक महत्त्व, गौरवशाली रेल्वे वारसा आणि नागपूर व विदर्भ प्रदेशाच्या विकासातील त्याचे योगदानाचे स्मरण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.
देशभरातील १०० वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक रेल्वे स्थानकांच्या गौरवशाली वारसाचा सन्मान करण्यासाठी रेल्वे मंत्रालय ‘स्थानक महोत्सव’ आयोजित करत आहे. या मालिकेत, नागपूर विभागातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
इतवारी रेल्वे स्टेशनचा इतिहास १९०८ सालापासून सुरू होतो. तत्कालीन बंगाल-नागपूर रेल्वेने ९ नोव्हेंबर १९०८ रोजी नागपूर आणि नागभीड दरम्यानच्या सुमारे १११ किलोमीटर लांबीच्या नॅर्रो-गेज रेल्वे मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरू केली. या रेल्वे सेवेमुळे नागपूर आणि आसपासच्या ग्रामीण व आदिवासी भागांना रेल्वे जोडली गेली आणि शिक्षण, व्यापार, रोजगार व प्रादेशिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नागपूर-नागभीड नॅर्रो-गेज रेल्वे सेवा, जी सुमारे १११ वर्षे सुरू होती, ती २४ नोव्हेंबर २०१९ रोजी बंद करण्यात आली. त्यानंतर या मार्गावर गेज रूपांतरणाचे काम सुरू झाले.
स्टेशनचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्व लक्षात घेऊन, त्याला महान स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले. महाराष्ट्र मंत्रिमंडलने २३ ऑगस्ट २०२२ रोजी नामकरणाच्या प्रस्तावला मंजूरी दिली आणि १६ जून २०२३ रोजी एक राजपत्र अधिसूचना जारी करून त्याचे नाव ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेलवे स्टेशन’ असे ठेवले. सध्या, हे स्टेशन नागपूर शहरातील प्रमुख प्रवासी टर्निमलपैकी एक आहे.
स्टेशन महोत्सवादरम्यान एक हेरिटेज गॅलरी विशेषतः प्रदर्शित केली जाईल. या गॅलरीमध्ये इतवारी रेल्वे स्टेशनचा ११४ वर्षांचा गौरवशाली इतिहास, नागपूर-नागभीड नॅर्रो-गेज रेल्वे सेवेचा ऐतिहासिक प्रवास, जुनी रेल्वे कागदपत्रे, छायाचित्रे आणि रेल्वे कामकाजाशी संबंधित ऐतिहासिक स्मृतीचिन्हे प्रदर्शित केली जातील. हेरिटेज गॅलरीमुळे प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि सामान्य जनतेला स्टेशनचा समृद्ध वारसा आणि भारतीय रेल्वेच्या ऐतिहासिक विकासाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. रेल्वे स्काउट्स आणि गाईड ध्वजसंचलन, पथनाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. स्टेशनच्या संकल्पनांवर आधारित मुलांच्या रेखाचित्रांचे आणि चित्रांचे प्रदर्शन भरवले जाईल आणि विजेत्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्रांनी सम्मानित केले जाईल. इतवारी रेल्वे स्टेशनवर सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचाही विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते सन्मान केला जाईल.















