एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे उद्गार
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : आज मी या प्रवासातील सर्व सहकाऱ्यांचेही आभार मानतो. या प्रसंगी एनडीएच्या सदस्यांनी एक ठरावही सादर केला आहे. ही तुमची उदारता आहे. मी हा प्रवास माझी वैयक्तिक उपलब्धी मानत नाही. ही आपल्या सर्वांची सामूहिक उपलब्धी आहे. ही एनडीएच्या प्रत्येक घटक पक्षाची समान उपलब्धी आहे. त्यामुळे, मी हा ठराव तुम्हा सर्वांना आणि भाजपसह आपल्या एनडीए परिवारातील सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे बोलताना काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशातील जनतेचे आभार मानले. तसेच भारत मंडपम येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान म्हणाले, आज मी या प्रवासातील सर्व सहकाऱ्यांचेही आभार मानतो. या प्रसंगी एनडीएच्या सदस्यांनी एक ठरावही सादर केला आहे. ही तुमची उदारता आहे. मी हा प्रवास माझी वैयक्तिक उपलब्धी मानत नाही. ही आपल्या सर्वांची सामूहिक उपलब्धी आहे. ही एनडीएच्या प्रत्येक घटक पक्षाची समान उपलब्धी आहे. त्यामुळे, मी हा ठराव तुम्हा सर्वांना आणि भाजपसह आपल्या एनडीए परिवारातील सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो.
भारताच्या जनतेची पारख करण्याची क्षमता नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे. राष्ट्रीय स्तरावरील राजकीय स्थिरतेचे महत्त्व देशातील जनतेने ओळखले आहे. जनतेच्या याच परिपक्वतेमुळे मला इतका काळ त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. २०१४ पूर्वीची दशके मोठ्या अस्थिरतेने आणि गोंधळाने भरलेली होती. त्याचा परिणाम म्हणून देशाला त्रास सहन करावा लागला. पण आता देशातील जनता एका स्थिर सरकारचे कार्य पाहत आहे आणि त्याच्या निर्णायक क्षमतेचीही चाचणी घेत आहे. मी जनतेचे आभार मानतो, असे ते म्हणाले. (पान ६ वर)









