लोकवाहिनी न्यूज
कीव : रशिया-युक्रेन संघर्ष हा तेल खरेदीला लक्ष्य करणाऱ्या उपाययोजनांद्वारे सोडवला जाऊ शकत नाही. या युद्धाचा शेवट संवाद, मुत्सद्देगिरी आणि वाटाघाटींद्वारेच करावा लागेल, अशी ठाम भूमिका युक्रेनमधील कीव येथे परराष्ट्र मंत्री अँड्र्री सिबिहा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडली.
रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका निर्बंध लाडण्यास मान्यता देईल का, या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी कीव येथे हे भाष्य केले. हा संघर्ष, जो आज पाचव्या वर्षात आहे, तो कोणीतरी तेल, ॲल्युमिनियम, खनिजे, धातू किंवा खते खरेदी करत आहे किंवा नाही, यावरून सुटणार नाही, असे जयशंकर म्हणाले. हा संघर्ष संवाद, मुत्सद्देगिरी आणि वाटाघाटींद्वारेच सुटेल, म्हणूनच, आम्ही अशा मार्गालाच प्रोत्साहन देऊ, असेही त्यांनी नमूद केले.
रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून संभाव्य निर्बंध लाडण्याबाबत चर्चा सुरू असताना, त्यांनी हे विधान केले. आपली ऊर्जा खरेदी ही राष्ट्रीय हितसंबंध आणि परवणारा व सुरक्षित ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या गरजेवर आधारित आहे, असे ते म्हणाले.
भारत-युक्रेन व्यापार संबंधांवर जयशंकर म्हणाले, द्विपक्षीय व्यापार अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे; यात औषधनिर्माण, अन्न आणि कृषी, खते, यंत्रसामग्री, रसायने आणि ग्राहक वस्तूंचा समावेश आहे. स्वाभाविकच, गेल्या चार वर्षांत युद्धजन्य परिस्थिती आणि वाहतूक व पुरवठा साखळी आदी आव्हानांमुळे या व्यापारात काहीसा व्यत्यय आला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारत तयार : जयशंकर यांचे प्रतिपादन
कीव : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत शक्य त्या सर्व प्रकारे योगदान देण्यास तयार आहे, असे प्रतिपादन युक्रेनची राजधानी कीव येथे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले. जयशंकर गुरुवारपासून युक्रेन आणि पोलंडच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज ते युक्रेनची राजधानी कीवमध्ये आहेत.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून कीवचा हा त्यांचा पहिला दौरा आहे. या दौऱ्यात जयशंकर यांनी सिबिहा आणि पोलंडचे उपपंतप्रधान राडोस्लाव्ह सिकोरस्की यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. बिश्केक येथे शांघाय कोऔरिएशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्ष संपवण्याचे आवाहन पुन्हा केल्यानंतर जयशंकर यांचे हे वक्तव्य आले आहे.
झेलेन्स्की यांची भेट
जयशंकर यांनी कीवमध्ये झेलेन्स्की यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य, रशिया-युक्रेन संघर्ष यावर चर्चा केली. झेलेन्स्की यांना भेटून आनंद झाला, असे जयशंकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी झेलेन्स्की यांना युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांच्याशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबाबत केलेल्या चर्चेची माहिती दिली. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या दृष्टिकोनावर आमची चर्चा केंद्रित होती.









