कुमारमंगलम बिर्ला यांनी केले कौतुक : युवकांना स्टार्टअप सुरू करण्याचे आवाहन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : देशातील प्रसिद्ध उद्योग कुमार मंगलम बिर्ला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तोंडभरून कौतुक केले. गुरुवारी नागपूर येथे आयोजित कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आदित्य बिर्ला ग्रुप आणि संघाच्या कार्यात अनेक समानता आहेत, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संघाने स्थापनेची १०० वर्षे पूर्ण केली हा काळ काही थोडा नाही. संघ समाजकार्यासाठी कायम उभा राहिलेला आहे, असे यावेळी कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.
सरसंघचालकांचे विचार, त्यांचे ध्येय आणि त्यांचे काम बघून मी प्रभावित झालो आहे. संघाच्या आज एवढ्या मोठ्या प्रमाणात शाखा आहेत. स्वातंत्र्यापूर्वी काळापासून आजपर्यंत अनेक संकटांच्या काळात संघ समाजकार्य करण्यासाठी उभा राहिलेला आहे. संघाने १०० वर्ष पूर्ण केलेले आहेत. हा काही थोडा काळ नाही, अशा शब्दांत त्यांनी संघाची स्तुती केली. तसेच, पंतप्रधान अमृतकालाबद्दल बोलत असतात. भारताचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. आता हा भारताचा काळ आहे, असेही यावेळी कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.
एथ आता आमच्या दरवाजावर आहे. भारतासाठी हा आव्हानाचा काळ आहे. मात्र भारत आता अमृतकाळात आहे. भारतात विकास होत आहे. आमच्या एका कंपनीची सुरुवात स्वातंत्र्याच्या काळात झाली. माझे पणजोबा त्या काळात कॉटन व्यवसाय करत होते. मात्र त्यात त्यांना विकास करायचा होता. त्यात त्यांनी बदल केला आणि व्यवसाय वाढविला. आदित्य बिर्ला ग्रुप आणि संघाच्या कार्यात अनेक समानता आहेत. शिक्षण, समाजसेवा यात आम्ही मोठ्या प्रमाणात योगदान देत असतो, असे कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.
आमच्या शाळा आणि कॉलेजमध्ये व्यक्तित्व विकासाला महत्त्व दिले जाते. उद्योगाने देशाचा विकास होत असतो. नेशन बिल्डिंग हा आमच्या परिवारातील महत्त्वाचा विषय आहे आणि आम्ही त्यावर काम करतो. मजबूत उद्योगाच्या सुरुवातीने राष्ट्र सावरत असत त्यातून विकास होत आहे. पायानंतर सगळ्यात जास्त सिमेंट लागते. समाजाला जोडणारे रस्ते, शाळा, घर सगळं सिमेंटने बनत असते. मेट्रो, रेलमध्ये काम मोठ्या प्रमाणात होत आहे. आमच्या सिमेंट कंपनीची क्षमता खूप वाढली आहे. ही कंपनी जगातील सगळ्यात मोठी सिमेंट कंपनी आहे, असे कुमार मंगलम बिर्ला यांनी आवर्जून सांगितले. आमच्या फायनान्स कंपनीची कर्ज देण्याची क्षमता २ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. आमची कंपनी सामान्यांना कर्ज देते. विकसित भारताचे स्वप्न मोठं आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या कंपन्या आवश्यक आहेत. युवकांनी भारतात काम करा, भारतासाठी काम करा, भारतात राहून काम करा, असे आवाहनही त्यांनी केले. हे युग भारताचे आहे. या आधी असा वेळ नव्हता. आता ती वेळ आली आहे. युवकांनी रोजगार निर्माण करा, स्टार्टअप सुरू करा, असे आवाहन कुमार मंगलम बिर्ला यांनी केले. मी आज दिवसभर संघ कसं काम करतो ते बघितलं, संघाचे काम देशाला पुढे नेण्यासाठी सुरू आहे, असेही शेवटी त्यांनी आवर्जून सांगितले.











