प्रा. अनिल सोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पदामुळे नव्हे, तर कार्यामुळे माणसाची प्रतिष्ठा वाढते, हा विचार मांडताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनिल सोले यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
आपल्या प्रदीर्घ सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक कार्याून समाजजीवनात आपला ठसा उमटविणारे प्रा. अनिल सोले यांच्या ६७व्या वाढदिवसानिमित्त प्रा. अनिल सोले मित्र परिवाराच्या वतीने ग्रँड बँकवेर्ट हॉल, दक्षिण एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले त्यावेळी मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितांना संबोधित करत होते.
यावेळी अनिल सोले यांचा नितीन गडकरी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सप्नीक शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. अनिल सोले यांच्या बहुआयामी कार्यावर आधारित ‘अविरत कार्यरत : प्रा. अनिल सोले’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय शिक्षक सहकारी बँक, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीसह विविध संघटनांतर्फे अनिल सोले यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार प्रा. संजय भेंडे, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, डॉ. गौरीशंकर पराशर, परिणय फुके, दयाशंकर तिवारी, उपेन्द्र कोठेकर, डॉ. विलास डांगरे, डॉ. विकास महात्मे, अनिल सोले यांच्या पत्नी अश्विनी सोले, परिणय फुके, कृष्णा गजबे, नाना श्यामकुळे, सुनील वाघमारे, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, जयप्रकाश गुप्ता आणि डॉ. गौरीशंकर पराशर यांच्यासह सह जिल्ह्यातील सर्व आमदार, भाजपचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, साहित्यिक, कलाकार, युवक तसेच प्रा. सोले यांचे सहкаारी व हितचिंतक मोठ्या संखेने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात अनिल सोले यांच्यासोबतच्या प्रदीर्घ सहवासातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थी परिषदेच्या संघर्षमय काळापासून सुरू झालेला हा प्रवास सामाजिक बांधिलकी, संघटनकौशल्य आणि जनसेवेच्या माध्यमातून पुढे गेला, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी परिषदेच्या काळात अनिल सोले हे गणित विषयाचे हुशार विद्यार्थी, उत्कृष्ट प्राध्यापक, उत्तम मल्खांबपट्टू आणि संवेदनशील साहित्यिक म्हणून परिचित होते. प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्यांनी केलेला संघर्ष, साधेपणाने जगलेले दिवस आणि संघटन उभारणीच्या आठवणी सांगताना गडकरी यांनी त्याकाळातील समर्पण अधोरेखित केले.
शिक्षक सहकारी बँकेच्या अडचणीच्या काळात अनिल सोले यांनी दाखवलेली जबाबदारी, तसेच बँकेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यांचे त्यांनी कौतुक केले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हजारो युवकांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमासाठी त्यांनी विशेष उल्लेख केला. अनिल सोले आणि त्यांच्या पत्नीला निरोगी, दीर्घायुष्य जीवनाच्या शुभेच्छा देत, त्यांचे समाजसभेचे कार्य अखंड सुरू राहावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन झाले, त्यानंतर अमर कुलकर्णी यांनी वन्दे मातरम सादर केले. कार्यक्रमाच्या प्रस्तावितातून गिरीश व्यास यांनी अनिल सोले यांच्या सेवाभाव आणि कार्य कर्तृत्वाचा गौरव केला. सूत्रसंचालन महेश तिवारी यांनी केले. योगेश बन यांनी मानपत्र वाचन केले. जयप्रकाश गुप्ता यांनी आभारप्रदर्शन केले.
भविष्यातही समाजसेवा करणार : अनिल सोले
अनिल सोले यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी असलेल्या स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. या आठवणी सांगताना ते भावुक झाले. युवा मोर्चाच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना, नितीन गडकरी यांचे नेतृत्व लाभणे हा आपल्यासाठी अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आयुष्य समृद्ध करणाऱ्या अनेक व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली.नितीन गडकरी यांच्या कार्यातून व विचाराlardan प्रेरणा घेत, भविष्यातही सातत्याने समाजसेवेत कार्यरत राहणार, असा संकल्प अनिल सोले यांनी व्यक्त केला.












