पक्ष कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन
लोकवाहिनी न्यूज:कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या सुनियोजित असल्याचा आरोप केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवेंदू म्हणाले की, त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित योजनेनुसार निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांनी सांगितले की, रथ यांच्या कुटुंबाची आणि जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी त्यांचे पक्ष घेईल.
सुवेंदू म्हणाले की, या हत्येमागे राजकीय हेतू असू शकतो. पण, त्यांनी सध्या यावर भाष्य करण्यास नकार दिला. त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सिद्धनाथ गुप्ता यांच्याशी संवाद साधला. सुवेंदू यांनी दावा केला की, योग्य तपासासाठी पोलिसांकडून फुटेजसंदर्भात कोणतीही माहिती मागण्यात आलेली नाही. त्यांनी सांगितले की, तपास पोलिसांवर सोपवण्यात आला असून, गुन्हेगारांना लवकरच पकडले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. सुवेंदू यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांना या परिस्थितीत कायदा हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन केले. बुधवारी रात्री अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
हा तर ममता बॅनर्जींच्या पराभवाचा बदला
चंद्रनाथ रथ यांच्या आईचा आरोप
कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचे सांत्वन करणे अशक्य झाले आहे.
आपला ४१ वर्षीय मुलगा गमावलेल्या हसिराणी रथ म्हणाल्या, मला फक्त न्याय हवा आहे, मी एक आई आहे, त्यामुळे दुसऱ्या कोणाचा मृत्यू व्हावा अशी माझी इच्छा नाही, पण त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. भाजप सत्तेवर आल्यामुळे त्याने हे कृत्य केले. आमचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेते सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेची मागणी करत आहेत, पण सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून भडकवणारी वक्तव्ये केली जात आहेत.
४ मे नंतर दिल्लीत तुमचे वडीलही तुम्हाला वाचवू शकणार नाहीत, असे ते म्हणत होते, याकडे हसिराणी रथ यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी नेमके तेच केले. जर माझ्या मुलाचा मृत्यू रस्ते अपघातात झाला असता, तर मी इतके लक्ष दिले नसते. पण ज्या प्रकारे गुंडांनी त्याची हत्या केली आणि तृणमूल काँग्रेसकडून ज्या खोट्या कहाण्या रचल्या जात आहेत, त्यामुळे मला खूप त्रास होत आहे. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यापासून माझ्या कुटुंबाला धमक्या मिळत आहेत.






