दिव्या धुरडे यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाचे आंदोलन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी ‘पद्मावत’ चित्रपटातील जोहर प्रसंगाबाबत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, जोहर करणाऱ्या वीर महिलांच्या शौर्य, त्याग आणि अस्मितेशी संबंधित भावनांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने आज झाँसी राणी चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
भाजप महिला मोर्चा नागपूर महानगरच्या अध्यक्षा दिव्या धुरडे यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकारी, नगरसेविका, मंडळ अध्यक्षा, वॉर्ड अध्यक्षा तसेच मोठ्या संख्यने महिला कार्यकर्या आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी स्वरा भास्कर यांच्या जोहरविषयीच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, इतिहासातील त्या काळातील अत्यंत कठीण आणि भयावह परिस्थितीत अनेक महिलांनी आपल्या स्वाभिमानासाठी व अस्मितेसाठी अतुलनीय त्याग केला. अशा ऐतिहासिक घटनांविषयी भाष्य करताना त्या काळचा संदर्भ, परिस्थिती आणि संबंधित समाजाच्या भावना लक्षात घेणे आवश्यक आहे. जोहर करणाऱ्या महिलांच्या त्यागाविषयी अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह अर्थ निर्माण होईल, अशा कोणत्याही वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.स्वरा भास्कर यांच्या वक्तव्यामुळे समाजातील विविध घटकांच्या भावना दुखावल्या असून, देशाच्या इतिहासातील वीर महिलांच्या त्याग आणि शौर्याबाबत संवेदनशीलता राखणे आवश्यक असल्याचे भूमिका महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
यावेळी प्रगती पाटील पालक महिला मोर्चा,विशाला जोशी महामंमंत्री,वंदना शर्मा महामंत्री, मोहिनी रामटेके संपर्क महामंत्री, स्वाती आखतकर संपर्क मंत्री, सीमा ढोमणे नगरसेविका, निधी तेलगोटे नगरसेविका, मंगला मस्के नगरसेविका, रजनी वानखेडे नगरसेविका, साधना बर्डे, शिल्पा पोहाणे, ऋतिका आमले, सुनीता इंगोले, मारिया लव्वणकर, प्रज्ञा गणवीर, प्रीती बहादुरे व रेखा वांडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, नागपूर महानगरच्या विविध पदाधिकारी व महिला कार्यकर्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.












