लोकवाहिनी न्यूज नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी पुन्हा एकदा विजय मिळवल्यानंतर भाजपमध्ये पराभवाच्या कारणांचा शोध सुरू झाला आहे. पराभवाची कारणे आता पक्षाकडून शोधली जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या निवडणुकीसाठी व्यक्तीशः लक्ष घातले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय प्रा. अनिल सोले यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढाकार घ्यावा लागला, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोले भावुक झालेत. त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले, मात्र या घडामोडींचा कार्यकर्ते आणि मतदारांवर नेमका काय परिणाम झाला, याचे आत्मचिंतनही भाजपला करावे लागणार आहे.
निवडणुकीत आपने सुधाकर कोहळे यांच्यावर लक्ष केंद्रित करत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्याशी थेट लढतीचे गणित मांडले होते. प्रचारात पहिल्या पसंतीच्या मतांवर अधिक भर दिला गेला. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना मिळालेली, अवैध ठरलेली मते, दुसऱ्या पसंतीच्या मतांचे महत्व पाण्याच्या रणनीतीत अपेक्षित प्रमाणात विचारत घेतले गेले नाही, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पहिल्या फेरीत वंजारी यांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीअखेर कोहळे यांनी बढ़त मिळवली. त्यामुळे भाजपच्या गोठात विजयाची आशा निर्माण झाली. मात्र, पहिल्या पसंतीच्या मतांवरून स्पष्ट निकाल न लागल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी निर्णायक ठरली. अखेर वंजारी यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच दुसऱ्या पसंतीच्या मतांचे नियोजन आणि त्यासाठीचा प्रचार किती महत्त्वाचा होता, यावर भाजपमध्ये मंथन सुरू झाले आहे.










