अमरावती विभागात उत्साहात मतदान
लोकवाहिनी न्यूज
अमरावती : शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदाननंतर रिंगणातील २६ उमेदवारांचे आमदारकीचे भाग्य मतपेटीत सील झाले आहे. आता सर्वांच्या नजरा २७ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या असून, उमेदवारांची धाकधूक कमालीची वाढली आहे. विभागातील अमरावती, वाशिम, यवतमाल, बुलढाणा व अकोला या पाचही जिल्ह्यांत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजतादरम्यान ८१ मतदार केंद्रांवर अत्यंत चुरशीने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. दुपारी १२ वाजतानंतर केंद्रांवर लागलेल्या रंगा या उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या ठरल्या. दुपारी २ पर्यंत अमरावती विभागात ६२.५४ टक्के मतदान झालेले होते. खत अमरावती मध्ये ६३.९ टक्क्के, अकोला ६४.१४ टक्क्के, यवतमाल ५९.९१ टक्क्के, बुलढाणा ६२.२५ टक्क्के तर वाशीम ६४.०६ टक्के मतदान झाले, दुपारी ४ पर्यंत विभागात ८० ते ८५ टक्के मतदान होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा संथ असला, तरी दुपारी १२ नंतर मात्र सर्वच केंद्रांवर शिक्षकांच लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. मतदान संपेपर्यंत ही गर्दी कायम होती. केंद्राबाहेररील बूथवर उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी गर्दीवाली दिसून आली. महाविकास आघाडी आणि महायुतीचे ज्येष्ठ नेते स्वतः मैदानात उतरून आपापला किल्ला सांभाळत होते. दुसरीकडे शिक्षक आघाडी आणि विविध संघटनांचे समर्थकही शड्डू ठोकून उभे होते. अमरावती येथील मुख्य बूथवर बसून इतर यवतमाल, वाशीम, अकोला व बुलढाणा या चार जिल्हात नेमकी काय स्थिती आहे, याचा मोबाइलवर आढावा घेताना नेत्यांची चांगलीच कसरत सुरू होती.
मतदान केंद्राच्या परिसरात दिवसभर अनेक उमेदवारांच्या जय-पराजयाची गणिते मांडली जात होती. यामध्ये प्रामुख्याने शिंदेसेनेचे किरण सरनाईक, काँग्रेसच्या अदिती पोहरे, प्रा. दिलीप कडू, संगीता शिर्के-बोंडे, श्रीकांत देशपांडे, शेखर बोयर, अविनाश बोर्डे, सुरेश देवकर, दत्तात्रय लहाने आणि प्रा. प्रशांत विघे या उमेदवारांची नावे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत होती. मात्र शिक्षकांनी नेमका कोणाच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवला आणि कोणाला नाकारले, याचा फैसला आता २७ ऑक्टोबरला मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.














