११४ पदकांची कमाई करत रचला स्वतःचाच विक्रम, जिंकली ३० सुवर्णपदके
लोकवाहिनी न्यूज
नागोए : भारताच्या पॅरा खेळाडूंनी एशियन पॅरा गेम्समध्ये अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करत इतिहास घडवला आहे. भारतीय संघाने ११४ पदकांसह आपली मोहीम संपवली. यामध्ये ३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य पदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी, भारतीय खेळाडूंनी विक्रमी ९ सुवर्णपदके जिंकली.
२०२३ मध्ये चीनमधील हांगझोउ येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने १०८ पदके जिंकली होती. तोपर्यंतची ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. यंदा भारताने हा विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे, यावेळी भारताने केवळ १६८ खेळाडूंचा संघ पाठवला होता. हा संघ २०२३ मध्ये पाठवलेल्या संघाच्या आकाराच्या जवळपास निम्मा होता.
भारत सध्या पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मात्र, शनिवारी काही स्पर्धांचे अंतिम सामने होणार असून, त्यामध्ये भारताचा सहभाग नाही. त्यामुळे अंतिम पदकतालिकेतील क्रमवारीतील बदल होण्याची शक्यता आहे.
अॅथलेटिक्ससोबत बॅडमिंटनमध्येही भारताचा दबदबा राहिला. भारताच्या एकूण पदकांमध्ये अॅथलेटिक्सचा सर्वाधिक वाटा राहिला. भारतीय खेळाडूंनी या क्रीडा प्रकारात ६५ पदके जिंकली, जी २०२३ च्या तुलनेत १२ ने अधिक आहेत. मात्र, यंदा सुवर्णपदके जिंकण्यात बॅडमिंटनपटू, तीरंदाज आणि नेमबाज मोना अग्रवाल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. बॅडमिंटनमध्ये भारताने तीन सुवर्णपदके जिंकली. पेरिस पॅरालिम्पिकचा चॅम्पियन नितेश कुमार याने पुरुष एकेरीच्या एसएल३ गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्याने (पान ६ वर)













