लोहारी सावंगा येथे सामान्य शेतकऱ्याच्या घरी जेवण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या आणि त्यांच्या समस्या जवळून जाणून घेण्याच्या उद्देशाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा शेतकऱ्यांसोबत दिवाळी केली. जिल्ह्यातील नरखेड तालुक्याच्या लोहारी सावंगा गावात पोहोचून मुख्यमंत्री यांनी शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. यावेळी ते सामान्य शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबीयांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री यांनी त्यांच्या भावना आणि समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. बालपांडे यांच्या घरी साध्या पद्धतीने महिलांनी बनवलेल्या जेवणाचा आनंद घेतला. जेवण्यात भाकर, चपाती, आलू वांग्याची भाजी, भरीत, वालाच्या शेंगेची भाजी, वरण, भात आदींचा समावेश होता.
संकटाच्या काळात सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलें पाहिजे. शेतकरी सध्या चिंतांत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना धैर्य देणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने त्यांनी थेट गावाला भेट दिली. या संवादातून त्यांनी शेतकऱ्यांचे मनोथैर्य वाढवण्याचे प्रयत्न केले.
लोहारी सावंगा येथे पोचताच प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुदेव सेवाश्रमाने आयोजित केलेल्या सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. त्यांनी भजन गायले आणि खंजरी व तालावर भक्तिपूर्ण वातावरणाचा आनंद घेतला. ग्रामपंचायत परिसरात शेतकऱ्यांशी संवाद साधताना, या संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यंदाचा खरीप हंगाम आव्हानात्मक
यावर्षाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत चांगला पाऊस पडल्यानंतर, पाऊस अचानक थांबला. परिणामी, सोयाबीनच्या शेंगेना अंकुर फुटला नाही. अनेक भागांमध्ये पिके करपली, तर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अनेक गावांमध्ये जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन, मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे वर्ष केवल शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर सर्वांसाठी ही आव्हानात्मक ठरले आहे. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार म्हणून या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात केली असून कर्जमाफीचाही निर्णय घेतला आहे. तसेच, सुमारे डेढ़ कोटी शेतकऱ्यांची अंदाजे ५८,००० कोटी रुपयांची थकीत वीज बिले माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.















