पेंच प्रकल्पातून नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही
वडगांव, वेणा, मकरधोकडा व सुरबर्डी प्रकल्पांतून कपातीचे निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत वार्षिक पाणी आरक्षण बैठक
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु अशा एकूण ७७ धरणांमध्ये १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सरासरी ५१.५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, गतवर्षी याच दिवशी हा साठा ९८.१८ टक्के होता. यंदा धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे वार्षिक पाणी आरक्षण सभा आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध प्रकल्पातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पिण्याच्या व औद्योगिक पाणी वापराबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले.
या बैठकीला जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नागपूर महानगरपालिका तसेच संबंधित प्रकल्पातील विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील सहस्रस्थितीतील उपलब्धतेचा जलसाठा आणि शासनाच्या ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निर्बातील निर्देशांची माहिती दिली.
पेंचमधून नागपूरच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही
पेंच मोठ्या प्रकल्पात १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ४८.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. पाणी आरक्षण मंजूर असून, उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहण्याची स्थिती आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या पाणी मागणीत सध्या कोणतीही कपात करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्यात कपात न करण्याचे निर्देश दिले.
चार प्रकल्पांमध्ये पाणी कपातीचे निर्देश
वडगांव, वेणा, मकरधोकडा आणि सुरबर्डी या प्रकल्पामधील पाणीसाठा व पाणीसाठ्याच्या आधारे ३१ ऑगस्ट भक्षितील पाणी उपलब्धतेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी मागणीत कपात करण्याचे निर्देश दिले. वडगाव धरणात ५५.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, पिण्याच्या पाण्याच्या मागणीत १० टक्के आणि औद्योगिक पाण्याच्या मागणीत १० टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले. वेणा मध्यम प्रकल्पात ६१.१० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याच्या मागणीत ३० टक्के, तर औद्योगिक पाण्याच्या मागणीत ४० टक्के कपात करण्यास सांगण्यात आले. मकरधोकडा मध्यम प्रकल्पात २७.५९ टक्के पाणीसाठा असून, पिण्याच्या पाण्याच्या मागणीत १० टक्के आणि औद्योगिक पाण्याच्या मागणीत २० टक्के कपात करण्याचे निर्देश आहेत. सुरबर्डी लघु प्रकल्पात ३८.९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, पिण्याच्या पाण्याच्या मागणीत ४० टक्के कपात करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
इतर प्रकल्पांसाठीही पाणी वापराचे नियोजन अन्य प्रकल्पांमध्ये बिगर सिंचन पाणी मागणीच्या अनुषंगाने उपलब्धतेचा विचार करून शासन निर्णयातील सूचनानुसार पिण्याच्या पाण्याच्या मागणीत १० टक्के कपात करण्याबाबत निर्देश देण्यात आले, तसेच औद्योगिक आस्थापनांनी एकूण पाणी वापरापैकी ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रण करता यावे, यासाठी आवश्यक पाळभूत सुविधा विकसित कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.
भविष्यात एखाद्या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी आकस्मिक मागणी प्राप्त झाल्यास त्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी झाल्यास, पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाणी सोडू नये, असे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा. तसेच एलनिनोच्या प्रभावामुळे उष्णतेड वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वतःच्या कुटुंबासह आवश्यकतप, पक्षी आणि पशुच्यांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.














