वाचनालय वैदर्भीयांचा शतायु वारसा : आ. संजय भेंडे
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : राजाराम वाचनालय ही शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वाटचाल आहे, या वाचनाляने अनेक लेखकांना समृद्ध केले, अनेकांना भाषा वरदान दिले, त्यामुळे राजाराम वाचनालय हा वैदर्भीयांचा शतायु वारसा असल्याचे मत आ. संजय भेंडे यांनी व्यक्त केले.
सीताबर्डी येथील राजाराम सीताराम वाचनालयाच्या नव्या इमारतीत पहिले दिवाळी अंक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष बापू भागवत, सचिव रवींद्र देशपांडे, उपाध्यक्ष विलास कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आ. संजय भेंडे यांनी, आजच्या डिजिटल युगात वाचकांना पुन्हा पुस्तкаंकडे वळवण्यासाठी वाचनालय जे प्रयत्न करत आहे, ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले. वाचनालयातील अमूल्य व जुनी पुस्तके आता डिजिटलाइज केली जाणार आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. समारोप प्रसंगी बोलताना वाचनालयाचे सचिव रवींद्र देशपांडे यांनी, दिवाळी अंक म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारे माध्यम असून, नागपुरात वाचनाची आणि दिवाळी अंक प्रदर्शनाची ही परंपरा अशीच अविरत सुरू ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात वाचकांसाठी विविध विषयांना वाहिलेले १५० हून अधिक दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध आहेत. शिवाय सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाचनालयात बसून दिवाळी अंक वाचनाची सोय करून देण्यात आली आहे. सूत्रसंचालन डॉ. शुभा साठे यांनी केले, तर आभार शारदा त्रिवेदी यांनी मानले. याप्रसंगी डॉ. सतीश देवपुजारी, राजाराम वाचनालय गोकुळपेठचे अध्यक्ष वसंत दक्षिणकर, फलज्योतिषतज्ज्ञ क्षिप्रा गोडसे, नगरसेविका धनश्री देशपांडे, नगरसेविका पूजा पाठक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.















