सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्तेकाळी व पिमळी मारबतची विधिवत पूजा
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूरची पारंपरिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख असणाऱ्या ‘मारबत महोत्सवाला’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नशील असून, मारबत महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भाविकांची श्रद्धा असलेल्या काळी व पि्वळी मारबत यांची विधिवत पूजा करण्यात आली. मारबत महोत्सव येत्या शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी आयोजित केले जाणार आहे.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटिल, मनपा आयुक्त डॉ. विपीन, सह पुलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोठे, ज्येष्ठ नगरसेवक आभा पांडे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरि, गांधीबाग झोन सभापती उमा देशमुख, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित, अपर पोलिस आयुक्त विनीता साहू, पुलिस उपायुक्त संदीप पाखले, पुलिस उपायुक्त राहुल माखनीकर, आदित्य मिरखेलकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, नगरसेवक तुषार लारोरकर, रेखा निमजे, नगरसेविका चेतना निमजे, कल्पना शर्मा, स्वीटी भिसिकर, रामभाऊ आंबुलकर, संजय अवचट, हेमंत बरडे, श्रीकांत आगलावे, कल्पक भानारकर, सहायक आयुक्त हरीश राऊत, अनिकेत धोपट, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.
जनतेचा सहभाग असणाऱ्या परंपरेचे जतन करणार
यावेळी ॲड. आशिष शेलार म्हणाले की, नागपूरच्या मारबत उत्सवाला १४५ वर्षांची प्रदीर्घ ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. इडा, पिडा, अनिष्ट प्रथा, परंपरा, रोगराई घेऊन जागे मारबत असे म्हणत अनिष्ट गोष्टींना तीरांजली वाहिल्या जाते, ही समाजासाठी उत्तम बाब आहे. मारबतसारख्या इतर उत्सवात ज्यात जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो अशा, पारंपरिक उत्सवांचे जतन, संवर्धन, प्रचार व प्रसार करण्याच्या राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस आहे.
अनिष्ट प्रवृत्ती घेऊन जा गे मारबत : नीता ठाकरे
महापौर नीता ठाकरे यांनी सांगितले की, मारबत व बडग्या म्हणजे केवळ सण नसून समाजातील अनिष्ट, वाईट गोष्टी आणि संकटे दूर करून शहराला प्रगतीच्या अधिक उंचीवर घेऊन जाण्याचे हे प्रतीक आहे. पोलीस विभाग आणि महानगरपालिका उत्तम समन्वयाने काम करत असून, यंदाचा हा महोत्सव नागपूरच्या वैभवात भर घालणारा ठरत आहे. समाजात वाईटाचा बीमोड करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.













