लोकवाहिनी न्यूज
बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील त्रिपक्षीय चर्चा संपन्न झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाच्या कठीण प्रक्रियेवर भर देत, ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, त्यांच्यासाठी ती सोडणे जवळपास अशक्य असल्याचे म्हटले. चीनच्या शेनझेन येथे आयोजित आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (एपीसी) शिखर परिषदेदरम्यान झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. पुतीन यांच्यासोबतच्या चर्चेच्या निकालाबाबत ट्रम्प यांनी सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या. अमेरिका, रशिया आणि चीनच्या नेत्यांमध्ये झालेली पहिली त्रिपक्षीय बैठक हा ऐतिहासिक क्षण असल्याचेही त्यांनी म्हटले.
ट्रम्प म्हणाले, या दौऱ्यामुळे अमेरिका, रशिया आणि चीनच्या नेत्यांमध्ये पहिली त्रिपक्षीय बैठक होण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. आजच्या दृष्टीने आणि मला वाटते, इतर अनेक बाबतीतही आपण खऱ्या अर्थाने इतिहास घडवत आहोत. ते पुढे म्हणाले, आपल्या तिघांकडे चर्चेसाठी अनेक विषय आहेत आणि आपण यापूर्वीही बरीच चर्चा केली आहे. जगातील तीन सर्वात मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून, केवळ आपल्या देशांतील नागरिकांवरच नव्हे, तर संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर खुलेपणाने, परस्पर आदराने आणि अर्थपूर्ण संवाद सुरू ठेवण्याची आपली विशेष जबाबदारी आहे.
या तीन महासत्तांमध्ये सहकार्याचे आवाहन करत ट्रम्प म्हणाले, अमेरिका, चीन आणि रशियाने जागतिक शांतता आणि स्थैर्याचे रक्षण केले पाहिजे. मतभेद सोडवण्यासाठी देशांनी चर्चेचा मार्ग स्वीकारावा आणि सुरक्षित भविष्यासाठी नव्या संधी शोधाव्यात, असेही त्यांनी नमूद केले. मतभेद असूनही इतर देशांशी संवाद साधण्यावर आपला प्रशासनाचा विश्वास असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले. ट्रम्प म्हणाले, अनेकदा असे घडत असे की, पूर्वीचे नेते ज्या देशांशी मतभेद होते, त्यांच्याशी चर्चा करण्याचे टाळत असत. मात्र, आमची भूमिका याच्या अगदी उलट आहे.













