मोदिंची सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांची तपःपूर्ती : पूर्ती
लोकबाहिनी न्यूज
नवी दिल्ली : विकसित भारत हे आपल्या जीवनाचे प्रमुख लक्ष्य असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे म्हटले की, विकसित होईपर्यंत आपण न थांबता, न थकता आणि आपल्या मार्गापासून न डळमळता काम करीत राहू.
भारतीय जनता पाटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनात प्रमुख म्हणून २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, २०४७ पर्यंत विकसित भारताची निर्मिती १४० कोटींहून अधिक देशवासी मिळून करतील. मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सरकारचे प्रमुख या नात्याने त्यांनी सलग २५ वर्षे पूर्ण केली आहेत.
विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान, गरिबीचे निर्मूलन आणि विविध क्षेत्रांत भारताला जागतिक नेतृत्वाच्या स्थानावर पोहोचवणे.
पंतप्रधान म्हणाले की, देशसमोर समस्या नक्कीच आहेत. मात्र भारताकडे १४० कोटी उपायही आहेत. तरुणांना देशाची मोठी ताकद असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, त्यांची ऊर्जा आणि सामर्थ्य विकसित भारताच्या निर्मितीत निर्णायक भूमिका बजावेल. भारताने छोटी उद्दिष्टे ठेवून पुढे जाऊ नये, तर असामान्य आणि अभूतपूर्व उद्दिष्टे निश्चित करावीत, असेही त्यांनी सांगितले.
जनसेवाच राष्ट्रसेवेचा मार्ग : नितीन नवीन
राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आपल्या भाषणात पंतप्रधानांचा सत्कार करताना सांगितले, ज्यांनी जनसेवाच आपल्या जीवनाचे ध्येय बनवले, ज्यांच्यासाठी जनसेवाच राष्ट्रसेवा मार्ग ठरली आणि जीवनातील याच संकल्पासाथी ज्यांनी राजकारणातील सत्तेला सेवेचे माध्यम बनवत राष्ट्रसेवेच्या मार्गावर सातत्याने वाटचाल केली, अशा आपल्या सर्वांच्या पंतप्रधाना मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो









