डॉक्टरांच्या हलगर्जीपणांमुळे बाळ पोटातच दगावल्याचा आरोप
-
लोकवाहिनी न्यूज
-
नागपूर : दिघोरी चौकात असलेल्या एस हॉस्पिटलबाबत एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूतसाठी दाखल केलेल्या एका गर्भवती महिलेकडे डॉक्टरांनी केलेल्या दुर्लक्षामुळे पोटातच नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. विशेष म्हणजे, मृत बाळ मागितले असता डॉक्टरांनी ते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यास टाळाटाळ केली, तसेच बाळाच्या अंगावर जखमा असल्याचा दावाही नातेवाईकांनी केला आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिला दाखल झाल्यानंतर जवाबदार डॉक्टरांनी तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. रुग्णालयात भक्ती केल्यानंतर मुख्य डॉक्टर महिलेची विचारपूस करण्यासाठी किंवा तपासणी करण्यासाठी आलेले नाहीत. केवळ परिचारिका (नर्स) येऊन सलाईन लावून जात होत्या, असा आरोप संतापलेल्या घरच्यांनी केला आहे. डॉक्टरांच्या याच बेजबाबदारपणांमुळे आणि वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे बाळ पोटातच दगावल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
-
यानंतर जेव्हा कुटुंबीयांनी ‘आमचे बाळ आमच्या स्वाधीन करा’ अशी मागणी केली, तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने बाळ देण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर, मृत बाळानंतर नातेवाईकांनी पाहिल्यावर त्याच्या अंगावर काही ठिकाणी जखमा असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संताप झालेले नातेवाईक व नागरिकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला आहे. डॉक्टरांच्या या गंभीर हलगर्जीपणाची आणि हुकूमशाही कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि तात्काळ हे रुग्णालय सील करावे, अशी आक्रमक मागणी पीडित कुटुंबाने प्रशासनाकडे केली आहे.











