आजवरची सर्वात मोठी संरक्षण ऑफर
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : बिश्केक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध पुन्हा एकदा दृढ झाले आहेत. नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी द्विपक्षीय बैठकीच्या पृष्ठभूमिओवर रशियाने भारताला आपल्या दोन सर्वात प्रगत शस्त्रप्रणाली एस-५०० प्रोमिशियस हवाई संरक्षण क्षेपणास्त्र आणि एसयू-५७ फेलॉन स्टेल्थ लढाऊ विमान विकण्याची तयारी दर्शवली आहे.
एस-५०० प्रोमिशियस हे रशियाच्या नवीन संरक्षण प्रस्तावाचे केंद्रस्थान आहे. भारताच्या ताफ्यात आधीपासूनच असलेल्या एस-४०० च्या यशावर आधारित पुढील पाऊल म्हणून रशिया याकडे पाहत आहे.








