लोकवाहिनी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : जालना विधानपरिषद मतदारसंघातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, सत्तेत असूनही आम्हाला बाजूला ठेवले जात आहे आणि स्थानिक स्तरावर दबाव आणला जातोय. आमच्या पारंपरिक गडांवर हल्ले होत असून, ही प्रक्रिया भाजपकडून स्लो पॉयझनसारखी सुरू आहे, असा आरोप करत शिवसेना पक्षातील नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संताप व्यक्त केला.
सत्तार यांच्या संतापाचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे पुत्र समीर सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निर्णयामुळे महायुतीत एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आमच्या पक्षाचा एक-एक गड हळूहळू संपत चालला आहे. आम्ही आमच्या नेत्याला माहिती न देता अशी स्थिती निर्माण होत असल्यात पश्चिम बंगालमधील उदाहरण पुन्हा महाराष्ट्रात घडू शकते, असे अब्दुल सत्तार यांनी चेतावणी स्वरूपे व्यक्त केले. सत्तार यांनी यावेळी स्थानिक राजकारणातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, पूर्वी आमच्या पक्षाकडून ग्रामपंचायत, नंतर जिल्हा परिषद आणि महापालिकेत आमच्या नेत्यांच्या विरोधात कृत्य सुरू झाले. स्थानिक स्तरावर या खदखदीचे परिणाम अधिक गंभीर स्वरूप घेत आहेत. संभाजीनगर हे आमचे पारंपरिक किल्ले आहे आणि यावर होणारा दबाव आमच्या मनात गंभीर भावना निर्माण करतो. सत्तार यांनी भाजपकडून आणि स्थानिक स्तरावरील नेत्यांकडून होणाऱ्या दबावावरही निशाणा साधला. आम्ही आमच्या नेत्याला सोबत घेऊन आलो, पण पुन्हा परिस्थिती तशीच होत आहे. ही स्लो पॉयझनसारखी प्रक्रिया आमच्या गडावर केली जात आहे. पैठण, सिल्लोड आणि इतर आसपासचे मतदारसंघ हळूहळू संपत आहेत, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सत्तार यांच्या मते, महायुतीतील ही अस्वस्थता फक्त व्यक्तिश: नसून संपूर्ण पक्षाला प्रभावित करत आहे. पालकमंत्र्यांचा पद असूनही आमच्या पक्षाचा इतर भाग संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये चालू घडामोडी पाहून दुःख होते. आमच्या नेत्याला आम्ही तंतोतंत माहिती देऊ, परंतु स्थानिक स्तरावरची मन:स्थिती गंभीर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्तार यांनी आपल्या संतापाची धागदाखली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले. मी याबाबत आपल्या नेत्यापर्यंत व्यथा मांडणार आहे. आमचा मुलगा समीर सत्तार याने उमेदवारी अर्ज दाखल करून सध्याच्या परिस्थितीची गंभीरता दाखवली आहे. यामुळे सध्याची शिवसेनेची अंतर्गत परिस्थिती स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले. अब्दुल सत्तार यांचा भाजपवरील राग अनावर झाला. अत्यंत आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले, शिवसेनेचे मुंडके उडवण्याचे काम आपला मित्रपक्ष करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे. भाजप आमच्या पक्षात गटत पाडत आहे. त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकेच तोडून टाकले आहे. आमची जिल्हा परिषद गेली, महापालिकेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाक्यांच्या काळापासून असणारी सत्ताही संपली, आता आमच्याकडे राहिले काय? अनेक छोट्या जागांवर वैयक्तिक भाजपचे नेते मोठे होत आहेत आणि शिवसेनेला संपवले जात आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, असे विधान त्यांनी केले. याबाबत विचारले असता, अब्दुल सत्तार म्हणाले की, मलाही वाटते की, आता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत. आमच्या नेत्यांनी, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर कोणालाही विचारण्याची गरज उरणार नाही. माझा नेता जो निर्णय घेईल, तो मला पूर्णपणे मान्य असेल, असे सत्तार यांनी यावेळी म्हटले.









