लोकवाहिनी न्यूज
नागपूर : तुम्ही ज्यांचं नाव घेत आहे ते गोविंददेव गिरी महाराज राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहे. ते असताना राम मंदिराची तिजोरी लुटण्यात आली. अशात त्यांची जबाबदारी निर्माण होत नाही का? सर्वाधिक जबाबदारी कोषाध्यक्षाचीच असते. ते कोषाध्यक्ष असताना कोटीवधीची लूट झाली आहे. एसआयटीच्या रिपोर्ट मध्येही तसं आलं आहे. त्यामुळे त्यांची चौकशीही झाली पाहिजे. हे म्हणतात पुण्यातून ऑडिटर पाठवत होते. हे पुण्यातून ऑडिटर पाठवण्यासारखं काम आहे का? एवढं मोठं मंदिर आहे, तो हिंदूंची अस्मिता आहे, त्यासाठी लोकांनी बलिदान दिले आहे, आणि हे पुण्यातून ऑडिटर पाठवत होते. मंत्रीपदासारख्या त्या खुर्चीला (कोषाध्यक्ष पद) काय चिकटून बसून आहात, हे आम्हाला कळत नाही. आम्ही त्यांचा राजीनामा मागत नाही, तरी ते स्वतः राजीनामा बद्दल बोलत आहे. ते राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष असल्याने सर्वाधिक जबाबदारी त्यांची आहे, असे रोखठोक भाष्य शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी येथे बोलताना केले.
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. अयोध्या राम मंदिर कथित गैरव्यवहार प्रकरणावरून त्यांनी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सर्व राज्यात ५० टक्के जागा वाढल्या, आणि सरकार त्या संदर्भातली भूमिका घेऊन संशोधन संदर्भात प्रस्ताव आणला, तर त्याबद्दल चर्चा होऊ शकते यासंदर्भात इंडिया ब्लॉकच्या कुठलाही पक्ष एकटेपणाने निर्णय घेणार नाही.. शिवसेना तसा निर्णय घेणार नाही, राष्ट्रवादी तसं निर्णय घेणार नाही, आणि काँग्रेसही तसा निर्णय घेणार नाही. आम्ही सर्व मिळून निर्णय घेऊ, असे राऊत म्हणाले.
तुम्ही वारंवार प्रश्न विचारत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना डेलीमिटेशन विधेयकाला समर्थन करेल, असा कुठलाही निर्णय झालेला नाही.. सुप्रिया सुळे यांनीही स्पष्ट केले आहे जर काही सुधारित प्रस्ताव आला, तर इंडिया ब्लॉकचे सर्व पक्ष एकत्रित बसतील आणि त्याबाबत सामुदायिक निर्णय होईल.. कोणताही पक्ष एकटा निर्णय घेणार नाही, जर कुठल्या पक्षाने एकटेपणाने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, तर इंडिया ब्लॉक मध्ये त्याबद्दलची चर्चा होईल. सामुदायिक आणि एकत्रित निर्णय घेतला जाईल आणि कृती केली जाईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात
ज्या पद्धतीने राम मंदिरात चोरी आणि लूटमार झाली आहे. हजारो आणि शेकडो कोटींची चोरी झाली आहे, ही गोष्ट विश्वास आणि श्रद्धेला तडा देणारी आहे. हा धक्का फडणवीस यांना सुद्धा बसला असेल. त्यांना जर खरोखरीच तसा धक्का बसला असेल तर त्यात त्यांनी सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा असल्याचे राऊत म्हणाले.
राम मंदिराच्या चाव्या आम्हाला द्या
भारतीय जनता पक्षाच्या नियंत्रणाखाली संपूर्ण राम मंदिराचा कारभार चालतो, असे राऊत म्हणाले. राम मंदिराचा कारभार चालवता येत नसेल तर राम मंदिराच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या हाती द्याव्यात अशी मोठी मागणीही राऊतांनी केली. तर त्याचवेळी राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात असल्याचा आरोपही राऊतांनी केला.













