लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : भाजपकडून टीएमसीवर होत असलेल्या राजकीय हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, अन्यथा भाजप ‘आप’प्रमाणे त्यांना त्रास देईल, असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना प्रस्ताव दिला आहे. पक्षातील लोकही अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे सध्या त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी स्वतः त्यांना वैयक्तिकरित्या फोन केला होता.
सूत्रांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी यावर निर्णय घेण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे. सूत्रांच्या मते, त्यांना असा प्रस्ताव देण्यात आला आहे की, जर त्यांनी टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले, तर त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव बनवता येईल.









