भारताची अंतरिक्ष क्षेत्रात मोठी झेप
लोकवाहिनी न्यूज
श्रीहरिकोटा : भारताने अंतरिक्ष क्षेत्रात आणखी एक मोठे यश मिळवले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) ने शुक्रवारी पहाटे श्रीहरिकोटा येथून जीएसएलव्ही-एफ१७ रॅकेटच्या माध्यमातून पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस-०५चे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रो अध्यक्ष व्ही. नारायण यांच्यासह अनेक माजी इस्रो अध्यक्षांच्या उपस्थितीत झालेले हे प्रक्षेपण अनेक अर्थानी ऐतिहासिक आहे.
प्रक्षेपळानंतर सुमारे १८ मिनिटांनी भारताचा पहिला इमेजिंग उपग्रह जिओसिंक्रोनस कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. ईओएस-०५ कडून रिअल टाईममध्ये छायाचित्रे मिलतीळ. यामुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांना मदत होईल. इस्रो प्रमुख नारायण यांनी सांगितले की, हे मिशन भारताच्या पृथ्वी निरीक्षण क्षमताओंना आणखी मजबूत करेल.
जीएसएलव्ही-एफ१७ रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलेले हे प्रक्षेपण जीएसएलव्हीचे १९वे उड्डाण आहे. ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजून ५५ मिनिटांनी सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेला हा उपग्रह भारताचा पहिला अत्याधुनिक भू-तुल्यकालिक इमेजिंग (जिओसिंक्रोनस ऑर्बिट) सेंटलाईट आहे.
गगनयान मोहिमेवरही काम सुरु
पंतप्रधानांच्या निर्देशानुसार इस्रो आणखी सहा लॉन्चचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहे. याशिवाय, गगनयान मिशनवरही सक्रियपणे काम सुरू आहे. अंतरिक्ष क्षेत्रातील स्टार्टअप्सबाबत इस्रो प्रमुखानी सांगितले की, देशात वातावरण सकारात्मक आहे. जीएसएलव्ही व्हेईकलद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रक्षेपणांमध्ये ईओएस-०५ हा सर्वात वजनदार उपग्रह आहे. या ऐतिहासिक मिशनशी संबंधित सर्व वैज्ञानिक आणि मिशन डायरेक्टर थॉमस कुरियन यांनी प्रक्षेपणातील यशानंतर एकमुखाने ‘जय हिंद’च्या घोषणसह देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
आहे. ईओएस-०५ मिशनचा उद्देश सब-जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापित केलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीची परिक्रमा करताना महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. प्रक्षेपळानंतर २२ मिनिटांनी मिशन डायरेक्टरने प्रक्षेपण यशस्वी झाल्याची घोषणा केली. त्यानंतर इस्रो प्रमुख नारायण यांनी यासंदर्भातील काही प्रमुख मुद्दे सांगितले. त्यांनी सांगितले की, एकदा पृथ्वी निरीक्षण उपग्रह ०५ कक्षेत कार्यरत झाल्यानंतर तो भारताचा जिओ-ऑर्बिटमधून पहिला समर्पित इमेजिंग उपग्रह बनेल, जो आपल्या देशासाठी महत्त्वाचा स्ट्रॅटेजिक डेटा उपलब्ध करून देईल.
आजचे श्रीहरिकोटा येथून इस्रोचे १०७वे प्रक्षेपण आहे. जीएसएलव्ही-एफ१७ मध्ये सातत्याने सुधारणा आणि अपग्रेड केल्यानंतर लॉन्च व्हेईकल सध्याच्या स्वरूपात कार्यरत आहे. इंडस्ट्रियल जगताच्या सहकार्याबरोबरच या मिशनच्या यशामागे इस्रोच्या वैज्ञानिकांचे टीमवर्क आहे. वैज्ञानिकांच्या कुटुंबातील सदस्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, असे त्यांनी सांगितले.
ईओएस-०५ काय आहे?
ईओएस-०५ हा अत्याधुनिक अर्थ ऑब्झर्व्हेशन संटेलाईट आहे. त्याचे मुख्य काम अंतरिक्षमधून पृथ्वीची इमेजिंग करणे आहे. त्याचे वजन सुमारे २,३६७ किलोग्राम आहे. ईओएस-०५ हा विशेषतः जिओसिंक्रोनस ऑर्बिटमधून पृथ्वीची इमेजिंग करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या ऑर्बिटमध्ये पोहोचल्यानंतर सेंटलाईट पृथ्वीच्या मोठ्या भागाचे वारंवार निरीक्षण करू शकेल. हे मिशन एनएसआयएलने एका स्ट्रॅटेजिक युजरसाठी समर्पित लॉन्च म्हणून केले आहे.












