सीसीसीच्या राजीनाम्याची मागणी, एसआयआर प्रक्रियेला विरोध
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (सीसीसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने मागे घेण्याची मागणी करत मंगळवारी ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्षांनी संसद भवनापासून भारत निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी भवनाजवळ सुमारे नेत्यांसह ३०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
संसद भवनाच्या मकर द्वारापासून सुरू झालेला हा मोर्चा सुरक्षा दलानी नीती आयोगाच्या कार्यालयाजवळ बॅरिकेडिंग करून अडवला. पुढे जाण्याची परवानगी न मिळाल्याने विरोधी पक्षांच्या खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या देत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी व आंदोलन केले. या मोर्चान्त काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांच्या खासदारांसह बिजू जनता दलाच्या (बीजेडी) खासदारांची सहभाग होता. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयावरून टोला लगावला, प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, दिल्लीत भाजपला एवढी मोठी कार्यालये उभारण्याची गरजच काय होती?













