बालमनांतील अस्वस्थतेचा प्रश्न ऐरणीवर
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : रामटेक तालुक्यातील देवलापार येथे मंगळवारी अवघ्या १३ वर्षांच्या मुलाने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, नागपूर ग्रामीण भागातून आणखी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. सावनेर तालुक्यातील खापा जवळील गडमी येथे १४ वर्षीय लावण्या विठ्ठल गोळंगे या शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सलग दोन दिवसांत घडलेल्या या बाल आत्महत्यांच्या घटनांमुळे संपूर्ण नागपूर जिल्हा सुन्न झाला आहे.
लावण्याचे वडील विठ्ठल गोळंगे हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात राबतात, तर आई देखील प्रसंगी शेतमजुरीची कामे करते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडील दोघेही बुधवारी दुपारी शेतात कामावर गेले होते. घरात लावण्या एकटीच होती. तिनेही आपल्या वयाच्या इतर मुला-मुलींप्रमाणे शिक्षणाचे स्वप्न पाहिले होते. खापा येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये ती नववीच्या वर्गात जिद्दीने शिकत होती.
पण बुधवारी दुपारी ती वेळ तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्याला काळोखात लोटणारी ठरली. साडेबाराच्या सुमारास घरातील व्यक्ती परत आल्यावर, ज्या लेकीच्या किलकिलाटाने घर भरलेले असायचे, तीच मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हा भयानक थरार पाहून कुटुंबाच्या पायाखालील जमीनच सरкаली. टाहो फोडून आई-वडिलांनी केलेले आक्रंदन उपस्थितांचे काळिज पिळवटून जाणारे होते.
या घटनेची माहिती मिळताच काका हिरामण धोंडगे यांनी ताաडीने खापा पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी घटनास्थलळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह सावनेरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. मात्र, एवढ्या कोवळ्या वयात लावण्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले? तिच्या मनात नेमके काय चालले होते? या प्रश्नाचे उत्तर अध्याप কোणाकडेही नाही. पोलीस तपासात सर्व बाजूंनी कसून चौकशी सुरू असली, तरी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
सलग दुसऱ्या दिवशी नागपूर ग्रामीण सुन्न
नागपूर ग्रामीण भागात घडलेल्या या दोन घटनांनी पालकांच्या मनात धडकी भरवली आहे. आजची तरुण पिढी, शाळकरी मुले एवढी टोकाची पावले का उचलत आहेत? त्यांच्या मनात चाललेल्या कोलाहलापर्यंत पोहोचण्यात पालक आणि समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय का? हा अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.














