-
नागपूर : शहरातील वर्दळीच्या सेंट्रल एव्हेन्यू व व्यापारी परिसर असलेल्या गीतांजली टॉकीजजवळील फ्रिजच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीने दोन घरेही कवेत घेतल्याने खळबळ माजली. फ्रिजच्या कॉम्प्रेसरमधील वायू व इतर ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने रौद्र रूप धारण केले, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानदार व दोन घरातील साहित्य जळाले.
-
सेंट्रल एव्हेन्यू हा नागपूरतील वर्दळीचा रस्ता असून दोन्ही बाजूने मोठी दुकाने आहेत. अनेकांची घरे एकमेकांना लागून आहेत. सकाळी पावणेऊऊ वाजताच्या सुमारास गीतांजली टॉकीजसमोरील मोहम्मद अश्फाक व मोहम्मद अतिक यांच्या अल कौसर रेफ्रिजरेशन या दुकानाला आग लागली. आज रविवार असल्याने गर्दी फारसी नव्हती. आगीच्या ज्वाला दिसताच नागरिकांत धावपळ माजली. अनेकांनी दुकानाकडे धाव घेतली. काहींनी त्वरित अग्निशमन विभागाला माहिती दिली.
-
जवळच असलेल्या गंजीपेठ अग्निशमन केंद्रातून अग्निशमन बंब पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, फ्रिजच्या कॉम्प्रेसरमधील वायूमुळे आगीचा आणखीच भडका उडाला. दुरुनच आगीचे लोट हवेत दिसू लागले. या आगीचा फटका शेजारीच राहणारे रमेश भाबळा व मनोज श्रीवास यांच्याही घराला बसला. यांच्या घरांनाही आगीने कवेत घेतले, परंतु आगीचे रौद्ररूप बघता सर्व कुटुंबीय घराबाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला.
-
आगीचा भडका व दाटीवाटीचे क्षेत्र असल्याने अग्निशमन जवानांना आगीवर पाणी मारण्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. अखेर त्यांनी आधी मनोज श्रीवास यांच्या घराला लागलेली आग नियंत्रणात आणली, त्यानंतर दुकानाचा आगीवर पाण्याचा मारा केला. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु दुकानातील फ्रिज, एअरकंडीशनर, वॉशिंग मशीन, कॉम्प्रेसर सह विद्युत तारा, पंखे, फर्निचर आदी जळाले.
-
दुकानदाराचे जवळपास ३५ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाने दिली. शेजारी राहणारे रमेश भाबळा यांच्या घरातील फर्निचर, पीओपी, विद्युत तारा आदी जळाले तर मनोज श्रीवास यांच्या घरालाही झळ बसली. घराची रंगरंगोटी सुरू असल्याने बरेच साहित्य बाहेर काढल्याने वाचल्याचे श्रीवास यांनी सांगितले. परंतु घरातील ५ हजारांची रोख, कपडे, ताडपत्री आदी जळल्याचे श्रीवास म्हणाले. आज रविवार असल्याने दुकानाकडे कोणीही गेले नाही, आगीची माहिती नागरिकांकडून मिळाल्याचे मोहम्मद अतिक यांनी सांगितले.
October 26, 2026
0 Comment
0 Views
गीतांजली टॉकीज चौकाजवळ दुकानासह दोन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी
by Digital Desk
लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील वर्दळीच्या सेंट्रल एव्हेन्यू व व्यापारी परिसर असलेल्या गीतांजली टॉकीजजवळील फ्रिजच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीने दोन घरेही कवेत घेतल्याने खळबळ माजली. फ्रिजच्या कॉम्प्रेसरमधील वायू व इतर ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने रौद्र रूप धारण केले, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानदार व दोन घरातील साहित्य जळाले. सेंट्रल एव्हेन्यू हा नागपूरतील वर्दळीचा... Read More













