लोकवाहिनी न्यूज मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, महायुतीमधील अंतर्गत वाद समोर आला असून, निवडणुकीत मित्रपक्ष शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. त्यावर सेनेचे युवासेना प्रमुख हेमंत बागुल यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले. ‘गप रे बन-पाच! सगळ्या जागा तुम्हालाच पाहिजेत का?‘ असा सवाल करत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील मित्रक्षामधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. पुणे आणि नागपूरमधील निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपला अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला. पुण्यात ऐनवेळेरी सचिन सानप यांना पाठिंबा देण्यात आल्याने महायुतीच्या एकजुटीला आग्रह धरल्यामुळे धक्का बसल्याचे बन यांनी म्हटले. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मित्रपक्षानी एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित असताना काही ठिकाणी वेगळी भूमिका घेतल्यामुळे महायुतीला निवडणुकीत नुकसान झाल्याचे बन यांनी सांगितले. शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळत सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीला विजय मिळवता असता, असा दावा त्यांनी केला. पुण्यातील एका जागेसाठी आग्रह धरल्यामुळे इतर मित्रपक्षांचे नुकसान झाल्याचा आरोप करत त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
बन यांच्या आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
नवनाथ बन यांच्या आरोपांना हेमंत बागुल यांनी सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले. पुण्यात भाजपचे आठ आमदार, दोन खासदार, शंभरहून अधिक नगरसेवक आणि तीन ते चार मंत्री असताना पक्षाला समाधान का नाही, असा सवाल त्यांनी केला. पुण्यातील एक जागा शिवसेनेला दिली असती, तर महायुतीचे एवढे मोठे नुकसान झाले असते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपला प्रत्येक जागा स्वतःकडे हवी आहे का, अशी टीका त्यांनी मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. महायुतीमध्ये शिवसेना केवळ भाजपची कामे करण्यासाठी सहभागी झालेली नाही, असे स्पष्ट करत बागुल यांनी मित्रपक्षांनाही योग्य सन्मान मिळायला हवा, अशी भूमिका मांडली. नवनाथ बन यांनी इतर पक्षांच्या विषयांत हस्तक्षेप करण्याऐवजी स्वतःच्या पक्षापुरते बोलावे, अशा शब्दांत बागुल यांनी त्यांना सुनावले.
महायुती ही केवळ सत्तेसाठी तयार झालेली युती नसून, ती परस्पर सन्मान, विश्वास आणि समन्वयाच्या आधारावर चालली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मित्रपक्षांनी एकमेकांच्या मर्यादा ओळखून परस्परांचा सन्मान राखणे आवश्यक आहे, असा इशाराही बागुल यांनी दिला. दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे. पुण्यातील जागेचे वाटप, निवडणुकीतील सहकार्य आणि मित्रपक्षांच्या भूमिकेवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे महायुतीमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा चर्चाेट आला आहे.












