लोकवाहिनी न्यूज
नागपूर : बेलतरोर्डी पोलिसांनी ड्रग्स तस्करीविरोधात मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून १८.३४ ग्राम एमडी पाउडर जप्त केली. आरोपी हे ड्रग्स विकण्याच्या उद्देशाने बाळगत होते. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी एमडी पाउडर, दोन मोबाईल फोन आणि एका अर्टिगा कारसह १६,६०० रुपये किमतीचा माल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलतरोर्डी पोलिसांचे एक तपास पथक परिसरात गस्त करत होते. त्यावेळी, नागपूर-वर्धा रस्त्यावरील खापरी कॉम्प्लेक्समधील भारत पेट्रोल पंपजवळ असलेल्या न्यू पंजाबी ढाब्यासमोर उभ्या असलेल्या एका पांढऱ्या अर्टिगा कारमधील (सीजी-०८-वाय-५७६०) चार तरुण पोलिसांना संशयास्पद वाटले.
पोलिसांनी गाडीजवळ जाऊन तपास केला आणि गाडीतील तरुणांची चौकशी केली. त्यांची ओळख भूषण रमेश कुरसंगे (३६) रा. चिंचभवन, वर्धा रोड, नितेश सुभाष साहू (२६) रा. दहेगाव रंगारी, सौरभ सतीश लब्करे (२३) रा. चिंचभवन आणि मोहित गजानन भाजीपाले (२३) रा. डोंगरगाव, वर्धा रोड अशी आहे.
आरोपींकडे अमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने, पोलिसांनी एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार साक्षीतारांच्या उपस्थितीत झडती घेतली. शोधमोहिमेदरम्यान, मुख्य आरोपी भूषण कुरसंगे याच्या पेंच्या खिशातून एका पांढऱ्या झिपलॉक बॅगेत १८.३४ ग्रॅम एमडी पाउडर जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की, त्यांनी ही एमडी पाउडर विक्रीसाठी आणली होती.
पोलिसांनी सर्व चार आरोपींना अटक केली असून, बेलतरोर्डी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासात असेही उघड झाले आहे की, मुख्य आरोपी भूषण कुरसंगे याची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


















