अण्णा हजारेचे आंदोलन, संघाची स्थापना आणि अहमद पटेल यांच्या निधनाच्या वर्षाबाबत चुकीच्या नोंदी
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बहुचर्चित ‘बिलोंगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशननंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. तब्बल ५४४ पाńskich या पुस्तकात सोनिया गांधी यांनी वैयक्तिक आयुष्यासह देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. मात्र, पुस्तकातील काही ऐतिहासिक घटनांची नोंदी चुकीच्या असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. भारतीय जनता पक्षासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या पुस्तकातील तथ्यांशवरून टीकेची झोड उठवली आहे.
‘फॅक्ट्स’ नावाच्या ‘एक्स’ खात्यावरून पुस्तकातील काही पानांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामध्ये तीन महत्त्वाच्या तथ्यात्मक चुका असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही तासांतच या कथित चुका वाचकांच्या निदर्शनास आल्याची पोस्टमध्ये म्हटले आहे.
पहिली चूक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासंदर्भात असल्याचे दावा करण्यात आला आहे. पुस्तकात हे आंदोलन २०१२ मध्ये झाल्याचा उल्लेख आहे. प्रत्यक्ष अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील देशव्यापी जनआंदोलन २०११ मध्ये झाले होते.
दुसरी चूक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनाच्या वर्षाबाबत असल्याचे सांगण्यात आले आहे. पुस्तकात संघाची स्थापना १९२१ मध्ये झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, संघाची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली होती.
तिसरी बाब काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाच्या वर्षाशी संबंधित आहे. पुस्तकात त्यांचे निधन २०२२ मध्ये झाल्याचे नमूद केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षत अहमद पटेल यांचे २५ नोव्हेंबर २०२० रोजी कोविड संसर्गामुळे निधन झाले होते.
भाजप नेते अनिल बोंडे यांचे टीकास्त्र
अमरावती : ‘बिलोंगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावरून भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. बाटला हाऊस चकमक, राम मंदिर आणि बाबरी ढाच्यावरून त्यांनी सोनियांच्या टीका केली. बाटला हाऊस चकमकीत अतिरेकी मारले गेले तेव्हा सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू आले. पण पोलीस अधिकारी मारले गेले तेव्हा कळवळला आला नाही असे खासदार अनिल बोंडे म्हणाले आहेत. देशविरोधी आणि आक्रमकांच्या बाजूने राहायचा हाच काँग्रेसचा एजेंडा असल्याचे नमूद करून त्यांनी सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावरून टीकेस डाogle. राम लल्ला इतके दिवस झोपडीत राहिले तेव्हा त्यांच्या मनात दुःख दाटून आले नाही, तथापि, गुलामीचे प्रतीक असलेला बाबरीचा ढांचा जेव्हा रामभक्तांनी पाडला, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया नकारात्मक होती. याकडे खासदार बोंडे यांनी लक्ष वेधले आहे. बाटला हाऊसमध्ये अतिरेकी मारले गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, परंतु कर्तव्य बजावताना पोलिस निरीक्षक शर्मा यांना वीरमरण आले तेव्हा त्यांच्या मनात कळवळला आला नाही. असा घणाघातातील बोंडे यांनी केला आहे. केवळ मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठीच हे सर्व घडत असून, परक्यांच्या आक्रमणाबाबत आणि देशविरोधी शक्तींच्या बाजूने उभे राहण्याचा हा काँग्रेसचा जुनाच एजेंडा असल्याची टीका खासदार अनिल बोंडे यांनी केली.















