मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मस्किल टिप्पणी
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : राहुल गांधींवर काय परिस्थिती आली? पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारा व्यक्ती एका छोट्या निवडणुकीवर ट्विट करत आहे. गोकुळमध्ये फक्त साडेचार हजार मतदार आहेत. पण त्यासाठी राहुल गांधींना दिल्लीत बसून ट्विट करावे लागत आहे. हा राष्ट्रीय मुद्दा नाही. पण राहुल गांधी यातही पडत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना केली.
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या संचालक निवडणुकीवरून वाद सुरू झाले आहेत. दोन्ही पक्षाकडे अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी पुरेसे संख्याबळ नाही. निवडणुकीत काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला २५ पैकी १३ जागा मिळाल्या होत्या तर महायुतीला १२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षांच्या निवडीचा पेच निर्माण झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान ‘गोकुळ’वर संचालक नेमले नसते तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, असे सांगितले. १३ जागा जिंकूनही कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे चेअरमन निवडता येत नाही. चेअरमन निवडण्यासाठी किमान १४ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीसाठी एक बैठक झाली. परंतु बैठकीसाठी संख्याबळ नसल्याने ती रद्द करावी लागली. आणखी एक, दोन बैठकी घेतल्या असत्या, आणि त्यात संख्याबळ नसते तर ही निवडणूक रद्द झाली असती. म्हणून सरकारने चार सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काही जण म्हणतात हा निर्णय टिकणार नाही. पण आम्ही ॲडव्होकेट जनरल यांचे मत विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे, असे नमूद करीत त्यांनी कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकतो की नाही, ते पाहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी लवकर निवृत्त होणार नाही असे विधान केले. एखाद्या व्यक्तीवर चित्रपट येत असेल तर तो निवृत्त होतो, पण आपण सध्या निवृत्त होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक वैयक्तिक गोष्टींवर मनमोकळेपणाने चर्चा केली. गेले अनेक वर्षांपासून मिळालेल्या स्वागताच्या शالى जमा करून त्या वृद्धाश्रमांना देत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, छंद जोपासता येत नसले तरी गाणी ऐकायला आवडतात, असे ते म्हणाले.
दिवाळीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत
सुट्टीचे कोणतेही विशिष्ट नियोजन नसल्याचे आणि विशिष्ट सुट्टी घेतल्याचे आठवत नसल्याचे त्यांनी नमूद केले. नागपूर सुट्टी सारखे वाटते. नागपूरला आलो की निवांतपणा वाटतो. मला जपानी नमा चॉकलेट आवडते. पुरणपोळी किंवा मोदक म्हटल्यास ते सर्वत्र उपलब्ध होतात, म्हणून कमी उपलब्ध असलेले चॉकलेट मैं मागवतो. दुष्काळ मदत आणि दिवाळी नियोजनावरही भाष्य केले. प्रत्येक मंत्री दिवाळीची एक दिवस कुठल्यातरी गावात शेतकऱ्यांसोबत साजरा करेल. नागपुरातील एका गावात जाऊन दिवाळी साजरी करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.














