सरसंघचालक भागवत यांनी व्यक्त केला विश्वास : पशुवैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : जग उपायांसाथी सातत्याने भारताकडे पाहत असून, भारत आपल्या पारंपरिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून जगाला विकासाचे एक नवीन मॉडेल देऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. रामटेक येथे दत्ता मेघे फाउंडेशनच्या पशुवैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते एका सभेला संबोधित करत होते. यावेळी व्यापीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयसवाल, आमदार समीर मेघे, माजी आमदार सागर मेघे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यरांच्या हस्ते दिवंगत भाजप नेते दत्ता मेघे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.
सरसंघचालक पुढे म्हणाले, आपण निसर्गाचे स्वामी नाही, तर त्याचाच एक भाग आहोत. त्यांनी मानवी जीवन, प्राण्यांचे आरोग्य आणि पर्यावरण यांच्यात सुसंवाद साधण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, जैवविविधता, पर्यावरणशास्त्र, प्राण्यांचे आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन हे मानवी कल्याणसाठी आवश्यक आहे. त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर सर्वांचे कल्याण सुनिश्चित करणाऱ्या जीवनशैली अवलंबण्याच्या गरजेवर भर दिला.
















