शाळा गटात नवयुग विद्यालयचा ‘सिंहगड’ प्रथम
लोकवाहिनी न्यूज
नागपुर : महालातील ‘शुभंकरोती’ व स्व. बाबासाहेब आपटे स्मारक समितीतर्फे आयोजित भव्य किल्ले स्पर्धेत जुना सुभेदार लेआउटमधील सार्थक मोहिते याcza ‘दुर्ग प्रतापगड’चा प्रथम क्रमांक आला, तर शाळा गटात महालातील नवयुग विद्यालयच्या ‘सिंहगड’चा प्रथम क्रमांक आला. गेल्या २४ वर्षापासून शुभंकरोтиतर्फे या किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी ही स्पर्धा फक्त लहान मुलांसाठीच होती हे विशेष. स्पर्धेत एकूण ३२ किल्लेदारांनी भाग घेतला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम, तंत्रज्ञानावरही मात करेल अशा कौशल्याने बांधलेल्या किल्लेयंचा लहान मुलांनी व तरुणांनी अभ्यास करावा व तशाच प्रकारची प्रतिकृती साकारावी या उद्देशाने ही किल्ले स्पर्धा होत असते.
प्रारंभी शिवाजी महाराजांना पुष्पांचण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. संयोजक मनोज वैद्य यांनी प्रास्ताविकातून संस्थेची भूमिका विशद केली. या प्रसंगी मंचावर शिवव्याख्याते राजेंद्र ताजने शिवांश, वार्सनिक (किल्ले प्रतापगड) यांचा क्रमांक आला. मोहिते नगर संघचालक सुधीर दप्तरी, किल्ले परीक्षक राहुल गुप्त व प्रणब हमदापुरे उपस्थित होते. राजेंद्र ताजने यांनी शिवकालिन किल्ल्यांचे वैविध्य व त्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे झटणारे सहकारी यांची माहिती दिली व प्रत्येककडून कौनगता गुण आपण घेतला पाहिजे हे सांगितले. शिवचरीत्र आपल्या घरी ठेवावे असा आग्रह देखील मुलांना व त्यांनी यावेळी केला. यावेळी प्रसाद पोफळी यांनी शब्दांकन केलेले सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल असा – द्वितीय – सान्वी जनई (किल्ले पुरंदर), तृतीय सुप्रिया व आराध्या जाधव (काल्पनिक), प्रोत्साहन- वल्लभ नागपुरे (किल्ले प्रतापगड), जगदंब मंडळ (काल्पनिक) व समूह क्रमांक आला.
शाळा गट – द्वितीय- भाऊजी दप्तरी इंग्लीश प्रायमरी स्कूल महाल, तृतीय – जामदार हायस्कूल, रेशीमबाग यांचा क्रमांक आला. शाळा गट – स्वा. सावरकर विद्या भवन, श्रीनिकेतन माध्यमिक शाळा, राजेन्द्र हायस्कूल यांचा क्रमांक आला. निवेदन दीपाली चिंचोलकर यांनी तर आभार प्रदर्शन आकांक्षा वैद्य यांनी केले.















