नरेंद्र मोदींच्या हस्ते ग्रीनफिल्ड रिफायनरीचा शुभारंभ
लोकवाहिनी न्यूज
जोधपूर : पश्चिम आशियातील युद्धामुळे संपूर्ण जग मंदीच्या विळख्यात सापडले असताना, भारताने २१ व्या शतकातील सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाचा यशस्वीपणे सामना केला आहे, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय, अचूक नियोजन आणि भारताच्या मजबूत मुत्सद्देगिरीमुळे देश इंधनाच्या मोठ्या धक्क्यातून सुरक्षित राहिला, असं प्रतिपादन त्यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले आणि सुधारित ‘उडान’ योजनेचा शुभारंभ केला. त्यांनी ग्रीनफिल्ड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समधून रिफायनरी उत्पादन टँकर्सना हिरवा झेंडाही दाखवला.
त्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. त्यांनी (ऊर्जा संकटाचा सामना कसा केला), ज्यामुळे देशांतर्गत पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
याच दरम्यान विरोधकांवर निशाणा साधताना पंतप्रधान म्हणाले, संकटाच्या काळात काही शक्ती देशात भीतीचे वातावरण आणि अफवा पसरवण्यात व्यस्त होत्या. मात्र, आमचे सरकार सर्वसामान्यांना अखंड ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पडद्यामागे अहोरात्र काम करत होते. भारताच्या एलपीजी गरजेपैकी जवळपास ६० टक्के भाग आयातीवर अवलंबून आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे ‘हॉर्मुजची सामुद्रधुनी’ बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता, ज्यामुळे भारतात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकला असता. युद्धाच्या काळात भारतीय मुत्सद्देगिरीने आपली खरी ताकद दाखवून दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या मजबूत संबंधांमुळे आपण अशा कठीण परिस्थितीतही जगातील तब्बल ४० देशांमधून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यात (पान ६ वर).
विरोधक निराशेच्या गर्तेत
भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल नकारात्मकता पसरवणाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले की, जे लोक जागतिक संकटाच्या काळात भारताच्या अपयशाची भविष्यवाणी करत होते, ते आज निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. भारताने आपल्या निर्णायक नेतृत्वाने आणि धोरणांनी जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे.
जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था अभूतपूर्व ऊर्जा संकटाचा सामना करत आहेत. मात्र, २१ व्या शतकातील नव्या भारताच्या इच्छाशक्तीनं आणि प्रयत्नांनी या महासंकटावर मात केली आहे. भारतानं प्रत्येक पातळीवर वेळेतच योग्य निर्णय घेतले, संकटाचा आधीच अंदाज घेऊन प्रभावी रणनीती आखली आणि आपल्या राष्ट्रीय संसाधनांचा संतुलितपणे वापर केला.













